एलईटी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्य विभागाची कारवाई…

देवगड : प्रतिनिधी एलईडी लाईटद्वारे मच्छिमारी करण्यास बंदी असताना त्याद्वारे मच्छिमारी करणाèया नाणार राजापूर येथील मच्छिमारी नौकेला पकडले. मत्स्यव्यवसाय विभागाने ही कारवाई ११ डिसेंबर रोजी पहाटे १.३० वा.सुमारास केली. शीतल या गस्तीनौकेद्वारे मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रंिवंद्र मालवणकर, पर्यवेक्षक सागर परब, दीपेश मायबा, सागरी सुरक्षा रक्षक स्वप्नील सावजी, चंद्रकांत कुबल, तांडेल श्री.qचदरकर, श्री.पाटील, श्री.पेडणेकर, पडवळ व राजपूत आदी कर्मचारी यांच्यासमवेत समुद्रात गस्त घालत असताना ११ डिसेंबर रोजी पहाटे १.३० वा.सुमारास देवगड लाईट हाऊससमोर १२ वावामध्ये एलईडी लाईट लावून उभ्या असलेल्या नाणार राजापूर येीिल शकील सागवेकर यांच्या नजाकत मेहरान या नौकेला पकडले.या नौकेला देवगड बंदरात आणून अवरूध्द केले असून पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती परवाना अधिकारी रqवद्र मालवणकर यांनी दिली.

You cannot copy content of this page