जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार

पालकमंत्री उदय सामंत यांचा विश्वास

वैभववाडी प्रतिनिधी-: जिल्ह्यात होऊघातलेले चारही नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. वैभववाडी नगरपंचायतीवरही शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. नगरपंचायतीवर सत्ता आल्यावर शहरातील निकृष्ट कामाची चौकशी करणार. तसेच शहराचा विकास देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. शहरवासीयांनी एक संधी द्यावी,आम्ही शहराचा कायापालट करु असे आश्वासनही पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील शिवसेना कार्यालयात मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली.

यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, बँक संचालक दिगंबर पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, माजी नगरसेवक संतोष पवार, रविंद्र तांबे, प्रदिप रावराणे,स्वप्निल, मानसी सावंत यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, या शहरासाठी खुप निधी दिला. मात्र तो खर्च झाला नाही. शहराला पाण्यासाठी साडेसात कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिला आहे. मात्र येथील नकारात्मक भुमिकेमुळे बराचसा निधी खर्च होऊ शकला नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.शहरात महाराणा प्रतापसिंह कलादालनाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. शिवसेनेची सत्ता आल्यावर या संपूर्ण कामाची चौकशी लावणार आहोत. जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीच्या निवडणूकीचे वातावरण आघाडीसाठी पोषक आहे. या चारही नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.तसेच जिल्हा बँकेतही सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील अस सामंत यांनी सांगितले.

वैभववाडीत आघाडीत झालेल्या फुटीबाबत पत्रकारांनी विचारले असता सामंत म्हणाले,सर्व पक्षांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र जिल्ह्यात दोन्ही मित्र पक्षांनी आपला शत्रू कोण आहे हे ओळखावे. आघाडी करण्यासाठी आमची दारे आजही खुली आहेत असे सामंत यांनी सांगितले. ( देवगडात धक्कादायक निकाल लागणार : पालकमंत्री) पत्रकाराने विचारलेले प्रश्ननावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले देवगड नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघडीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहे. याठिकाणी धक्कादायक निकाल लागणार आहे असे सांगत महाविकास आघाडीची सत्ता येणार असं सांगितले.

You cannot copy content of this page