पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6 वा. रत्नागिरी येथून मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 8.30 वा. कै. श्रीधर नाईक चौक, शिवसेना संपर्क कार्यालयाजवळ, कणकवली येथे वाढदिवस…

Read More

मिस इंडिया स्पर्धेत सिंधुदुर्गच्या सायली सावंतची भरारी

द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक विजेतेपदाचा पटकावला मान *⚡कणकवली ता.२५-:* गुरुग्राम येथे पार पडलेल्या मिस डायडेम इंडिया २०२१ च्या मिस इंडिया या स्पर्धेत सिंधुदुर्गचा नावाचा ठसा उमटला असून सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावची सुकन्या कु.सायली नारायण सावंत तिने द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक हे विजेतेपद पटकावले आहे सिंधुदुर्गची कन्या तसेच मुंबई -बोरिवली गोराई येथे राहणारी…

Read More

कणकनगर बंधाऱ्यात पाणी जातेय वाया

प्लेटस बसविण्याचे काम योग्य पद्धतीने करण्याची मागणी *⚡कणकवली ता.२५-:* कणकवली येथील गडनदीतील पाणी अडविण्यासाठी कनकनगर येथील केटी बंधार्‍याला प्लेट्स घालण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, गेल्या वर्षी प्लेट्स घालण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे केटी बंधार्‍याला लावलेल्या प्लेट्स पाणी अडविण्यासाठी की वाहण्यासाठी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित झाला होता. त्यामुळे लाखोरुपये खर्च करून घालण्यात येणार्‍या…

Read More

शहर भाजप कडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी…

*⚡सावंतवाडी ता.२५-:* देशाचे माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, नेमळे सरपंच विनोद राऊळ, हेमंत…

Read More

आमदार दीपक केसरकर यांना धमकीचे फोन…

पुन्हा वाट्याला याल तर परिमाण वाईट होतील; आमदार दीपक केसरकर *⚡सावंतवाडी ता.२५-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांना विरोधकांकडून धमकीचे फोन येत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी असल्या धमक्यांना आपण घाबरून जाणार नाही. परंतु, पुन्हा माझ्या वाट्याला याल तर परिणाम वाईट होतील असा इशाराच…

Read More

उपमुख्यमंत्री उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसोबत करणार चर्चा; सतीश सावंत यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.२५-:* जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या उमेदवारासोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, ते शरद कृषी भवन येथे संवाद साधणार आहेत. अशी माहिती माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

विरोधकांनी तलावाच्या काठी बाजारपेठ नेऊन तलावाची झोपडपट्टी केली…

आमदार दीपक केसरकर यांची संजू परब यांचे नाव न घेता टीका.. सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी मी कटिबध्द आहे. आठवडा बाजार तळ्याच्या काठावर नेऊन तलवाची झोपडपट्टी केली असा, आरोप आमदार दीपक केसरकर यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे नाव न घेता सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच केसरकर पुढे बोलताना म्हणाले सावंतवाडी…

Read More

शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा सर्वसामान्यांना फटका

१५ दिवसात तोडगा न काढल्यास मोर्चा;मंगेश तळवणेकर यांचा पालकमंत्र्यांना इशारा *⚡सावंतवाडी ता.२५-:* : शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घरांसाठी तसेच रस्ते, पूल, संरक्षक भिंती या कामांसाठी चिरे, वाळू, खडीची गरज आहे. मात्र, ज़िल्ह्यात एकच वाळू लिलाव लागला आहे. त्यातच महसूल प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन खात्यामार्फत वाळू, खडी, चिरे वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई केली जाते. त्यामुळे ‘घरकुल’च्या घरासह अनेक…

Read More

सह्याद्री महामार्गाचा भाग असणाऱ्या दाणोली ते बांदा रस्त्याचे काम दोन दिवसात होणार सुरू …

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती… सावंतवाडी ता.२५-: दाणोली ते बांदा या रस्त्याचे काम येत्या २ -३ दिवसात सुरू होणार असून, बांदा ते दोडामार्ग रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हे सर्व काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहे. हा संपूर्ण रस्ता सह्याद्री महामार्गाचा भाग असून, कणकवली मधून दाणोली मार्गे बांदा असा हा रस्ता असणार आहे….

Read More

यंगस्टार मित्रमंडळातर्फे श्रावण शाळेला माक्स व सॅनिटायझर वाटप

*⚡कणकवली ता.२५-:* श्रावण वरची परबवाडीतील यंगस्टार मित्र मंडळाच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 तालुका मालवण या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना माक्स आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले आहे. हे वाटप श्रावण गावचे सरपंच प्रशांत परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, उपाध्यक्ष साक्षी परब, शिक्षणप्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, ग्रामपंचायत सदस्य रागिनी…

Read More
You cannot copy content of this page