कणकनगर बंधाऱ्यात पाणी जातेय वाया

प्लेटस बसविण्याचे काम योग्य पद्धतीने करण्याची मागणी

*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली येथील गडनदीतील पाणी अडविण्यासाठी कनकनगर येथील केटी बंधार्‍याला प्लेट्स घालण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, गेल्या वर्षी प्लेट्स घालण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे केटी बंधार्‍याला लावलेल्या प्लेट्स पाणी अडविण्यासाठी की वाहण्यासाठी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित झाला होता. त्यामुळे लाखोरुपये खर्च करून घालण्यात येणार्‍या प्लेट्सच्या मध्ये गॅप न राहता यामधून पाणी वाहणार नाही याची काळजी लघू पाटबंधारे विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पावसाळा संपल्यानंतर गडनदीत बांधण्यात आलेल्या केटी बंधार्‍यांमध्ये लघू पाटबंधारे विभागामार्फत लाखो रुपये खर्च करून प्लेट्स घालण्यात येतात. त्यामुळे गडनदीतील पाणी अडविले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात पाणी या नदीमध्ये असल्याने शहरासह लगतच्या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत नाही. पावसाळा संपला तरी शहरातील कनकनगर येथील केटी बंधार्‍याला प्लेट्स घालण्याबाबत दुर्लक्ष झाले असून त्या प्लेट्स लवकरात लवकर बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. प्लेट्स घालण्याचे काम निकृष्ट दर्जा करू नये, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. कनकनगर येथील केटी बंधार्‍यात गतवर्षी लघू पाटबंधारे विभागाकडून प्लेट्स घालताना रबर किंवा पँकिंगचे योग्य काम न झाल्याने त्या मध्ये गॅप राहून धबधब्याच्या प्रवाहाप्रमाणे पाणी वाहत होते. केटी बंधार्‍याला लावलेल्या प्लेट्स पाणी अडविण्यासाठी की वाहण्यासाठी? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत होता.तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले होते. मात्र, यंदा प्लेट्स घालण्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांना केली जात आहे.

You cannot copy content of this page