विरोधकांनी तलावाच्या काठी बाजारपेठ नेऊन तलावाची झोपडपट्टी केली…

आमदार दीपक केसरकर यांची संजू परब यांचे नाव न घेता टीका..

सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी मी कटिबध्द आहे. आठवडा बाजार तळ्याच्या काठावर नेऊन तलवाची झोपडपट्टी केली असा, आरोप आमदार दीपक केसरकर यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे नाव न घेता सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

तसेच केसरकर पुढे बोलताना म्हणाले सावंतवाडी शहरात नळपाणी योजना देखील आपण आणली आहे. विरोधकांनी कोणते एक काम केले ते दाखवावे असे आव्हान त्यांनी यावेळी विरोधकांना केले आहे. शहरातील नाट्यगृह पावसाळ्यात कोसळल्या नंतर ते आधुनिक करण्यासाठी आपण निधी दिला असून, त्याचे काम सुरू आहे.

You cannot copy content of this page