*⚡कणकवली ता.२५-:* श्रावण वरची परबवाडीतील यंगस्टार मित्र मंडळाच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 तालुका मालवण या शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना माक्स आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले आहे.
हे वाटप श्रावण गावचे सरपंच प्रशांत परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, उपाध्यक्ष साक्षी परब, शिक्षणप्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, ग्रामपंचायत सदस्य रागिनी पवार, माता पालक संघाचे उपाध्यक्ष पायल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, सर्व पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. माक्स आणि सॅनिटायझर वाटप करताना यंगस्टार मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष संजय परब तसेच आकाश परब, दीपेश परब, विवेक धुरी, सुमित परब, सुरेश वारंग, आनंद मुळीक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने यंगस्टार मित्र मंडळाला पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा देऊन आभार मानण्यात आले.
