कणकवली ता.२५-: महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना कणकवली विधानसभेच्यावतीने रविवार 26 डिसेंबर 2021 रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, नरडवे नाका येथे सकाळी 8.30 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत आवर्जुन उपस्थित राहुन शिवसैनिकांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्विकारणार आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना सचिव खास.विनायक राऊत , शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर , लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पाभाई पराडकर , जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक , आमदार दिपक केसरकर , जिल्हाप्रमुख संजय पडते , जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत , अतुल रावराणे , महिला जिल्हा संघटक नीलम पालव, माजी जि.प.सदस्य बाळा भिसे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील सर्व शिवसेना, युवासेना, महिला, शिवसेना सेल, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, समन्वयक, संघटक, उपविभागप्रमुख, युवासेना तालुका अधिकारी, महिला तालुका संघटक, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, नगरसेवक, जि.प.सदस्य, प.स.सदस्य, युवासेना व महिला विभागप्रमुख , सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी पालकमंत्री महोदयांस शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी केले आहे.
