सह्याद्री महामार्गाचा भाग असणाऱ्या दाणोली ते बांदा रस्त्याचे काम दोन दिवसात होणार सुरू …

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती...

सावंतवाडी ता.२५-: दाणोली ते बांदा या रस्त्याचे काम येत्या २ -३ दिवसात सुरू होणार असून, बांदा ते दोडामार्ग रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हे सर्व काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहे. हा संपूर्ण रस्ता सह्याद्री महामार्गाचा भाग असून, कणकवली मधून दाणोली मार्गे बांदा असा हा रस्ता असणार आहे. या रस्त्याचा बराचसा भाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, दोडामार्ग तालुका हा सिंधुदुर्गातील शेवटचा आणि डोंगराळ तालुका असून, त्याचा विकास होणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात आता होत असून, प्रथम तेथील रस्ते सुधारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा सह्याद्री महामार्ग दोडामार्ग मधून गोव्याला जोडला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

You cannot copy content of this page