गवारेड्यानी केले वायंगणी शेतीचे नुकसान
*⚡बांदा ता.०५-: पाडलोस-केणीवाडा येथे पहाटेच गव्यानी आपला मोर्चा वायंगणी शेतीत वळवला. गवा आल्याची भनक लागताच शेतकरी एकनाथ नाईक यांनी सुमारे पंधरा मिनिटे थाळी वाजवून त्याला हाकलले. परंतु तोपर्यंत गव्याने पूर्ण शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शासनाकडून आम्हाला नुकसानभरपाई नको परंतु आमच्या शेती-बागायतीचे तरी अशा उपद्रवी रानटी प्राण्यांपासून संरक्षण करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मडुरा पंचक्रोशीतील…
