पाडलोस-मडुरा-शेर्ले रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष ः वाहनचालकांतून तीव्र संताप

*⚡बांदा ता.०५-:* बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा, शेर्ले भागात महाकाय खड्डे पडल्याने रस्ता वाहनचलाकांसाठी डोकेदुखी बनत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याची दुरावस्था झालेली असताना लोकप्रतिनिधीही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे.

You cannot copy content of this page