चौकुळमध्ये कार जाळण्याचा प्रयत्न

जत्रेदरम्यान घडला प्रकार : पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू

*⚡सावंतवाडी ता.०५-:* चौकुळ येथील जत्रेसाठी गेलेल्या कलंबिस्त हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची अंगणात पार्क केलेली कार अज्ञाताने पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला हा प्रकार काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला. अभिजीत जाधव असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे यात त्या कारचा पेट्रोल टाकीच्या बाजूने असलेला बंपर तसेच टाकीचे झाकण जळून मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी तक्रार देण्यासाठी जाधव यांनी कुटुंबासह येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम चालू होते.

You cannot copy content of this page