कामकवली 5 जानेवारी (प्रतिनिधी)- मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या सोबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी कास्ट्राईब संघटना मंत्रालयीन सचिव सुरेश तांबे,राज्य सरचिटणीस शिक्षक संघटना आकाश तांबे, महासंघ महासचिव किशोर कदम, प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष अमित ठाकूर ,प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा सचिव विकास वाडीकर, जिल्हा उपाध्यक्ष विद्यानंद शिरगावकर, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष मंगेश साळसकर, माध्यमिक जिल्हा महासचिव महेशकुमार नाईक, तसेच जिल्हा आरोग्य विभाग सचिव दीपक कांबळे, आदी उपस्थित होते.
आजच्या सभेमध्ये श्रीमती. आफरीन मौलाना शेख या सध्या कोणत्या आस्थापनेवर कार्यरत आहेत असे संघटनेच्यावतीने विचारण्यात आले असता त्यांना सावंतवाडी मुख्यालयामध्ये हजर करण्याचे सांगितले व त्यांच्यावर होणाऱ्या प्रशासकीय अन्यायाबाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांना मिळणाऱ्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रस्ताव येत्या आठ दिवसात तात्काळ मंजूर करण्यात येतील असे शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर सांगितले. तसेच जिल्हांतर्गत बदली संदर्भात सुगम, दुर्गम याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करणे व सुगम, दुर्गम भागाचे फेरसर्वेक्षण करण्याचे मान्य करण्यात आले याबाबत लवकर आदेश काढण्यात येईल असेही सांगितले. तसे शिक्षकांच्या पगारा संदर्भात सीएमपी प्रणाली लवकरात लवकर राबवून शिक्षकांचे पगार वेळेत देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. तसेच शाळेच्या लाईट बिलासंदर्भात शिक्षण विभागाला योग्य तो आदेश देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी सांगितले.ग्रामसेवकांना कायम सेवा प्रमाणपत्र मुदतीत देण्याचे कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे तसेच ग्रामसेवकांच्या कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेत सेवेत कायम करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले .आदर्श ग्रामसेवक पुरस्कार निवड स्पर्धात्मक व नि:पक्षपाती व्हावी अशी मागणी करण्यात आली . तसेच कर्तव्यदक्ष व प्रामाणिक काम करणाऱ्या ग्रामसेवकावर अन्याय होऊ नये असे मत संघटनेने मांडले. आरोग्य विभातील कर्मचार्यां ना कोवीड योद्धा म्हणून योग्य त्या काम कर्मचार्याचे नाव जाहीर करण्यात यावे . नांव नोंदणी करणारे कोविड योद्धा आणि प्रत्यक्ष पेशंटशी संपर्कात राहुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले . अनेक आरोग्य कर्मचार्यांना कोविड योद्धा प्रशस्ती पत्र देवुन सन्मानित करण्यात आलेले नाही . त्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले . अशा अनेक विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच या सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन होऊन महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला . त्यामध्ये पदोन्नती व सरळ सेवा भरती अनुशेषाबाबत आकडेवारी सांगून येत्या मेगाभरतीमध्ये अनुशेष भरण्याचे सांगण्यात आले.
बिंदुनामावली व पडताळणी करण्यात आली आहे असेही सांगण्यात आले जे कर्मचारी निलंबित झालेले आहे त्यांना तात्काळ कामावर हजर घेण्यासाठी संघटनेची विनंती मान्य करण्यात आली ज्यांची सेवा सलग १०,२०,३० झाली आहे अशा कर्मचाऱ्यांचे बावीस प्रस्ताव प्रलंबित असून ते मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे असेही सांगण्यात आले अनुकंपा भरती बाबत जिल्हा परिषदेच्या प्रस्ताव मंजूर झाले असून 26 प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे असेही यावेळी सांगण्यात आले अशा अनेक विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली या सदर वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पाटील , शिक्षण विभाग प्रमुख दत्ता गायकवाड साहेब ,उपशिक्षणाधिकारी शेरलेकर तसेच इतर सर्व विभागातील खातेप्रमुख उपस्थित होते.
