पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी

बंटी पुरोहित यांच्याकडून पंजाब सरकारचा निषेध

*⚡सावंतवाडी ता ०५-:* पंजाब दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधान सुमारे १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी राहिल्याने पंजाबमधील कॉंग्रेस सरकारचा भाजप युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांनी निषेध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी राहिली. खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी रस्त्याने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात होते. यादरम्यान आंदोलकांनी सुमारे ३० किमी अंतरावरील उड्डाणपुलावर त्यांचा मार्ग अडवला. १५-२० मिनिटांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पंतप्रधानांचा ताफा भटिंगा विमानतळावर परतला. भटिंडा विमानतळावर परतल्यावर पंतप्रधान मोदींनी तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले , “तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार की मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परत येऊ शकलो.” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. पंजाबमधील या घटनेचा भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. भाजप युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांनी पंजाबमधील कॉंग्रेस सरकारच्या या वर्तुवणुकीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयानेही पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी राहिल्याबाबत या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

You cannot copy content of this page