वेंगुर्ले उभादांडा सागरेश्वर मंदिरात १ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन
वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले उभादांडा येथील समुद्रकिनारी वसलेल्या श्री देव सागरेश्वर मंदिरात शिवप्रेमी, शिवभक्त व भाविक व सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरीवाडी यांच्या वतीने मंगळवार दि.१ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. पासून शिवपिंडीवर संततधार, मंगळवार दि. १ मार्च रोजी महाशिवरात्री दिवशी विधीपूर्वक शिवपिंडीचे पूजन,…
