मालवण ता.२५ प्रफुल्ल देसाई-:* येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर धुरीवाडा,मालवण यांच्यावतीने मराठी राजभाषा दिना निमित्त साने गुरुजी वाचन मंदिरच्या दादा शिखरे सभागृह धुरीवाडा,मालवण येथे काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवि दादा मडकईकर आणि मालवणी कवि रुजारिओ पिंटो हे सहभागी होणार आहेत.
२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वास्तववादी ग्रामीण आणि मालवणी कवितांच्या सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी काव्य रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन साने गुरुजी वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष श्री.रुजारिओ पिंटो यांनी केले आहे.
