महिला दिनानिमित्त कार्यक्रमांना साकेडीत उस्फूर्त प्रतिसाद

कवयित्री सुप्रिया प्रभू मिराशी, तलाठी योजना सापळे यांचे मार्गदर्शन कणकवली ता.१३-:* महिला दिनाचे औचित्य साधून साकेडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रिना राणे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या विविध उपक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात प्रामुख्याने गावातील महिलांनी सादर केलेली गाणी तसेच हिरीरीने भाग घेत सादर केलेले फनी गेम्स सर्वांच्याच पसंतीस उतरले. महिला दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक…

Read More

शासकीय महाविद्यालयाचे स्वप्न खा.राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे साकार

जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती; कणकवली ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज हा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करत सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला परवानगी मिळवली आहे. तसेच त्यांचा १५ मार्चला वाढदिवस होत असल्याने सिंधुदुर्ग शिवसेनेच्यावतीने कृतज्ञता सत्कार सोहळा भगवती मंगल कार्यालय…

Read More

शिवडाव येथील मांडकार देवालयाचा उद्या वार्षिक सप्तप्रहर हरिनाम सप्ताह

कणकवली ता.१३-:* तालुक्यातील शिवडाव ओटोसवाडी येथील मांडकार देवालयाचा वार्षिक अखंड सप्तप्रहर हरिनाम सप्ताह सोमवार १४ मार्च रोजी साजरा होत आहे. तर महापुरुष देवालय पिंपळपार येथे त्रैवार्षिक श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे १६ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. सप्तप्रहर हरिनाम सप्ताहाची घटस्थापना १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता होणार असून सकाळी ११ वाजता पासून आरती दर्शन तीर्थप्रसाद…

Read More

देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीची भाजपाच्या वतीने होळी

महाविकास आघाडीचा धिक्कार असो : कार्यकर्त्यांडून जोरदार घोषणाबाजी *⚡वैभववाडी ता.१३-:* सायबर विभागामार्फत फोन टॅपींग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसीची वैभववाडीत होळी करण्यात आली. यावेळी वैभववाडी भाजपाच्या वतीने आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम.., महाविकास आघाडीचा धिक्कार असो… अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी सरकारकडून…

Read More

बांदा येथे वेषभुषा स्पर्धेत भक्ती आळवे प्रथम

बांदा दि.१३-:* बांदा येथील जिल्हा परीषद केंद्र शाळा क्र.१ मध्ये श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व बांदा नट वाचनालय यांच्या सयुक्त विद्यमानाने महीलादिनाचे औचीत्य साधुन खास विवाहीत महीलांसाठी वेशभुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेस उस्फुर्त प्रतीसाद लाभला. स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, डॉ. सोनल लेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

Read More

४६ वर्षांनी ‘ते’ पुन्हा एकत्र आले

पुनर्मिलन सोहळा निमित्ताने टोपीवाला हायस्कुल १९७५-७६ दहावी बॅच विद्यार्थी पुन्हा शाळेत मालवण ता.१३-:* ४६ वर्ष पूर्वीच्या आठवणींना उजाळा देत, मालवण येथील अ. शि. टोपीवाला हायस्कुल च्या १९७५-७६ सालच्या इयत्ता दहावी वर्ग बॅचचे माजी विद्यार्थी गेट टू गेदरच्या निमित्ताने एकत्र आली. मालवण बोर्डिंग ग्राउंड येथील सुलोचना श्रीपाद पाटील हॉल मध्ये टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक जोशी सर यांच्या…

Read More

विनायक कांदळगावकर यांचा नवकलाकार नाट्यमंडळातर्फे सन्मान

मालवण ता.१३-:* तारकर्ली गावातील ज्येष्ठ कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शक विनायक कांदळगावकर हे बरेच वर्षे पॅरालिसिसने आजारी असल्याने तारकर्ली गावातील नवकलाकार नाट्य मंडळ तारकर्लीच्या पदाधिकारी कलाकारांनी कांदळगावकर यांच्या रहात्या घरी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करतानाच आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. विनायक कांदळगावकर यांनी तारकर्ली गावात अनेक कलाकार घडविण्याचे काम केले. मात्र सध्या ते आजारी आहेत….

Read More

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती… मालवण (प्रतिनिधी) शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त १५ मार्च रोजी मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने मालवणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, खास. राऊत यांच्या रूपाने जिल्ह्याला विकासपुरुष लाभला आहे. पायाला भिंगरी लावून खास. राऊत काम…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांचा हस्ते मसदे चुनवरेत रस्त्याचे भूमिपूजन

मालवण ता.१३-:* मसदे चुनवरे बौद्धवाडी ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांचा हस्ते करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या जनसुविधा निधीमधून सदर कामास मंजुरी मिळाली होती. या वेळी विरण चूनवरे रस्ता, चूनवरे शेत पाट बंधारा या विकास कामांची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणी नुसार सदर विकासकामे सुद्धा आपण लवकर पूर्ण करू…

Read More

आचरा येथे २५ मार्चपासून ‘डोंगरेवाडी प्रीमियर लीग’चे आयोजन

मालवण ता.१३-:* आचरा डोंगरेवाडी येथील श्री देव महापुरुष डोंगरेवाडी क्रिकेट संघाच्या वतीने २५ ते २७ मार्च या कालावधीत डोंगरेवाडी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुल्या नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्वरूपात खेळविली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ११ हजार रुपये, उपविजेत्या संघास ७ हजार रुपये तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघासाठी अनुक्रमे ३…

Read More
You cannot copy content of this page