आचरा येथे २५ मार्चपासून ‘डोंगरेवाडी प्रीमियर लीग’चे आयोजन

मालवण ता.१३-:* आचरा डोंगरेवाडी येथील श्री देव महापुरुष डोंगरेवाडी क्रिकेट संघाच्या वतीने २५ ते २७ मार्च या कालावधीत डोंगरेवाडी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुल्या नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्वरूपात खेळविली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ११ हजार रुपये, उपविजेत्या संघास ७ हजार रुपये तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघासाठी अनुक्रमे ३ हजार व आकर्षक चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांनाही रोख रक्कमेच्या पारितोषिकासह चषके दिली जाणार आहेत.

स्पर्धा लीग पद्धतीने खेळविली जाणार आहे. स्पर्धेत नावनोंदणी करणाऱ्या प्रथम १२ संघाना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धेत १९ मार्चपर्यंत प्रवेश निश्चित करावा. २० मार्चला खेळाडूंचा लिलाव होईल. प्रत्येक संघात एक आयकॉन खेळाडू असेल. या स्पर्धेचे थेट प्रेक्षपण युट्युब वाहिनीवरून केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पांडुरंग कदम (8369129297), संकेत परब (9420070373) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page