शिरोडा समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला…

वेंगुर्ला ता.२०-: शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस जोडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची काही प्रमाणात संख्या वाढली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पर्यटन हा पर्वणीचा शब्द बनला असून ज्याच्या त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार अनेक जण पर्यटन करू लागले आहेत. एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित राहणार असून त्याचा फायदा स्थानिकाना होणार आहे.

Read More

फोंडाघाट पाचोबा जवळ कारला अपघात होऊन दोघे जखमी

कणकवली ता.२०-:* कोल्हापूरहून कणकवली च्या दिशेने जाणारी कार झाडाला ठोकरुन फोंडाघाट पाचोबा जवळ अपघात झाला.या अपघातात कारमधील दोघे प्रवासी जखमी झाले आहेत. कार क्र. ( MH – 43 AR -2337 ) मधील प्रवासी कणकवलीच्या दिशेने जात होते. पाचोबा देवस्थान नजीक कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली. या अपघातात कारमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी…

Read More

राज्यस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत मालवणची आर्या दिघे उपविजेती

मालवण ता.२०-:* श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डेरवण युथ गेम्स २०२२ या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ११ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये मालवण येथील कु. आर्या दिघे हिने उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत कु. आर्या हिने १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्येही तृतीय क्रमांक पटकाविला. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित डेरवण…

Read More

नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांना सरपंच रत्न नारी गौरव पुरस्कार जाहीर

कणकवली ता.२०-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सरपंच आफ्रोजा नावलेकर यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भारतज्योती सरपंच रत्न नारी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सरपंच रत्न नारी गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदगाव परिसरातून आफ्रोजा नावलेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Read More

आचरा सोसायटी चेअरमनपदी अवधूत हळदणकर तर व्हाईस चेअरमनपदी संतोष मिराशी बिनविरोध

मालवण ता.२०-:* श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा सोसायटीच्या चेअरमनपदी अवधूत हळदणकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी संतोष मिराशी यांची एकमताने निवड झाली. श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलने तेराही जागांवर बाजी मारत निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव केला…

Read More

आचरा पिरावाडी येथे शिमगोत्सवाचे आयोजन

मालवण ता.२०-:* आचरा पिरावाडी येथील ग्रामोन्नती मंडळातर्फे दि. २० ते २५ मार्च या कालावधीत शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज रविवारी २० रोजी संत तुकाराम बिज (घुडघूडा) साजरी करणे, संध्याकाळी मांड उभा करणे, आणि श्री देव चव्हाटा रामेश्वर भेटीसाठी रवाना, तरुणसंघ दक्षिणवाडा पिरावाडी यांचे सुश्राव्य घुमटवादन या…

Read More

मडुरा पुलाच श्रेय दीपक केसरकर यांनाच…

उल्हास परब; स्वतःच्या घराकडील खड्डे बुजवू न शकलेले पुला संदर्भात काय पाठपुरावा करणार..? सावंतवाडी ता.२०-:मडूरा पुलासंदर्भात शिवसेनेतर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या कडे आम्ही वारंवार मागणी केली होती. तसेच तेथील समितीने देखील याकडे आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. स्वतःच घरासमोरील खड्डे बुजवता न येणारे संजू परब पुलासाठी काय पाठपुरावा करतील असा टोला शिवसेना विभाग…

Read More

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत ३०० रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

आमदार वैभव नाईक यांचे आयोजन *मालवण ता.२०-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यामार्फत प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २६ मार्च २०२२ रोजी पासून मोतीबिंदू पूर्व तपासणी होणार असून याचा शुभारंभ मालवण ग्रामीण रुग्णालय येथे होणार आहे. डॉ. तात्याराव…

Read More

७२० दिवसात शहरातील एक खड्डा देखील न बुजवणारे संजू परब हे स्वतःच टामटुम…

रूपेश राऊळ; पक्षात कमी झालेलं स्थान टिकवण्यासाठी संजू परबांची धडपड सावंतवाडी ता.२०-: ७२० दिवसात शहरातील एक खड्डा देखील बुजवू न शकणारे संजू परब हे स्वतःच टामटूम असून, या दिवसात त्यांनी काय दिवे लावले ते सावंतवाडीतील जनतेला माहित आहेत. अशा शब्दात रुपेश राऊळ यांनी संजू परब यांची खिल्ली उडवली आहे. निवडणुकीत दिलेल्या वचना पैकी संजू परब…

Read More

नगरपालिकेचे बॅजेट सांगत येत नाही ते महाराष्ट्राचे बॅजेट काय सांगणार…?

रूपेश राऊळ;संजू परब यांच्यावर टिका.. सावंतवाडी ता.२०-:* संजू परब यांना आपल्या नेत्याला नगरपालिकेचे बजेट सांगता येत नाही. ते महाराष्ट्राचे बजेट काय सांगणार…? त्यामुळे संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या विकास कामांवर बोलू नये असा पलटवार तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, संजू परब यांची पक्षातील जागा कमी होत…

Read More
You cannot copy content of this page