उल्हास परब; स्वतःच्या घराकडील खड्डे बुजवू न शकलेले पुला संदर्भात काय पाठपुरावा करणार..?
सावंतवाडी ता.२०-:मडूरा पुलासंदर्भात शिवसेनेतर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या कडे आम्ही वारंवार मागणी केली होती. तसेच तेथील समितीने देखील याकडे आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. स्वतःच घरासमोरील खड्डे बुजवता न येणारे संजू परब पुलासाठी काय पाठपुरावा करतील असा टोला शिवसेना विभाग प्रमुख उल्हास परब यांनी लगावला आहे. त्या पुलासाठी आमदार दीपक केसरकर यांनीच प्रयत्न केले असून, त्याचे सर्व श्रेय त्यांनाच जात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
