Headlines

आचरा पिरावाडी येथे शिमगोत्सवाचे आयोजन

मालवण ता.२०-:* आचरा पिरावाडी येथील ग्रामोन्नती मंडळातर्फे दि. २० ते २५ मार्च या कालावधीत शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज रविवारी २० रोजी संत तुकाराम बिज (घुडघूडा) साजरी करणे, संध्याकाळी मांड उभा करणे, आणि श्री देव चव्हाटा रामेश्वर भेटीसाठी रवाना, तरुणसंघ दक्षिणवाडा पिरावाडी यांचे सुश्राव्य घुमटवादन या कार्यक्रमांसह मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे प्रस्तुत महान पौराणिक दशावतार नाटक पृथ्वी हरण सादर झाले.

तर २१ मार्च रोजी रात्री मधलावाडा ग्रामस्थ पिरावाडी यांचे सुश्राव्य घुमटवादन, रात्री १०.३० वाजता यशवंत बालनाट्य मंडळ मधलावाडा यांचा नाट्यप्रयोग सतीचा शाप (सादरकर्ते- यशवंत बालनाट्य मंडळ मधलावाडा) दि. २२ रोजी रात्री ९.३० वा. श्रीकृष्ण सेवा मंडळ कृष्णनगर यांचे सुश्राव्य घुमटवादन, रात्री १०.३० वा श्रीकृष्ण सेवा मंडळ कृष्णनगर यांच्या सौजन्याने नाट्यप्रयोग- गाव तसो चांगलो (सादरकर्ते श्री रामेश्वर प्रोडक्शन मुंबई), दि. २३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ वा. गावमागणी कार्यक्रम रात्री ९.३० वा. विठ्ठल समाज विकास मंडळ उत्तरवाडा यांचे सुश्राव्य घुमटवादन, रात्री १०.३० वा. विठ्ठल समाज विकास मंडळ उत्तरवाडा यांच्या सौजन्याने महापुरुष दशावतार नाट्यमंडळ त्रिंबक साटमवाडी यांचा पौराणीक दशावतार ‘उग्रदंत उग्रासूर’ सादर होणार आहे. तर दि. २४ रोजी उर्वरीत गावमागणी कार्यक्रम, रात्री ९.३० वा. सर्व गामस्थांचे एकत्रीत सुश्राव्य घुमटवादन, रात्री ११ वाजता ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी पुरस्कृत, दिलिप पराडकर आयोजित दशावतार नाट्यमंडळ खुडी यांचा पौराणीक दशावतार, रात्री १२ वाजता पचिक घालणे, दि. २५ रोजी पहाटे ५.३० वाजता घुमट वादन, भुपाळी, आरती ७ वाजता गुलाल उधळून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page