मालवण ता.२०-:* श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा सोसायटीच्या चेअरमनपदी अवधूत हळदणकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी संतोष मिराशी यांची एकमताने निवड झाली. श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सहकार पॅनेलने तेराही जागांवर बाजी मारत निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव केला होता.
चेअरमन निवडीनंतर नुतन पदाधिका-यांचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि प सदस्य जेरोन फर्नांडिस, माजी सरपंच राजन गावकर, विश्वास गावकर, जयप्रकाश परुळेकर, बंटी तांडेल यांनी चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांचे अभिनंदन केले. ।या निवडी वेळी विद्यमान संचालक भाजप पुरस्कृत संचालक धनंजय टेमकर, प्रमोद कोळंबकर, प्रिया आचरेकर, समीर बावकर, प्रफुल घाडी, भिकाजी कदम, लवू मालंडकर, प्रशांत पांगे, लक्ष्मण आचरेकर, निशा गांवकर, मनाली तोंडवळकर उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना चेअरमन अवधूत हळदणकर यांनी नवीन संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत राहणार असून शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या हित जोपासण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली.
