फोंडाघाट पाचोबा जवळ कारला अपघात होऊन दोघे जखमी

कणकवली ता.२०-:* कोल्हापूरहून कणकवली च्या दिशेने जाणारी कार झाडाला ठोकरुन फोंडाघाट पाचोबा जवळ अपघात झाला.या अपघातात कारमधील दोघे प्रवासी जखमी झाले आहेत. कार क्र. ( MH – 43 AR -2337 ) मधील प्रवासी कणकवलीच्या दिशेने जात होते. पाचोबा देवस्थान नजीक कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली.

या अपघातात कारमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना स्थानिक सुमित मेजारी, अप्पा सामंत यांनी १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

You cannot copy content of this page