Headlines

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण…

कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर. ⚡कुडाळ ता.१३-: आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील रंगकर्मी मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मालवण नगरपरिषदेच्या मामा वरेरकर नाट्यगृहासाठी…

Read Full News

“टीका माझ्यावर करा, राजघराण्यावर नाही…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले: “ग्रो बीग खासगी संस्था, सामाजिक नाही; नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट.. सावंतवाडी : ग्रो बीग टेक्नॉलॉजी ही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी असल्याने नगरपरिषदेकडून नियमानुसार भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र, संबंधित संस्थेने १५ दिवसांचेच भाडे भरून दीड महिना जागेचा वापर केला असून, एका खोलीची परवानगी घेऊन तीन खोल्यांचा वापर केल्याचा आरोप…

Read Full News

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या छात्रसैनिकांची एनसीसी शिबिरात चमकदार कामगिरी..

⚡सावंतवाडी ता.१२-: ओरोस येथील एनसीसीच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या छात्रसैनिकांनी वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक आणि सांघिक क्रीडा प्रकारात उपविजेतेपद मिळवून उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला.वक्तृत्व स्पर्धेत कॅडेट दुर्वांग वालावलकर आणि कॅडेट कनिष्का जळवी यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर सांघिक क्रीडा प्रकारात कॅडेट राजदीप बांदेलकर आणि कॅडेट अक्षरा गवळी यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. दहा…

Read Full News

नगराध्यक्षांची वागणूक ट्रम्पसारखी”…

मायकल डिसोजा :२०० स्क्वेअर फूट जागेसाठी १५ दिवसांचे १.८० लाख भाडे; ⚡सावंतवाडी ता.१२-: १५ दिवसांकरिता २०० स्क्वेअर फूट जागेच नगराध्यक्षांनी १ लाख ८० हजार भाड आमच्याकडे मागितल. एक महिन्यासाठी हा रेट ३ लाख ६० हजार होत असून हे भाड अमेरिकेच आहे. नगराध्यक्षांची वागणूक अमेरिकेच्या ट्रम्प सारखी असून उपनगराध्यक्षांनी शेरा मारला म्हणून हे त्यांनी केल आहे‌….

Read Full News

मालवणचे संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संतचरित्रकार रवींद्र धामापूरकर यांचे निधन…

⚡मालवण ता.१२-:मालवणचे संतचरित्रकार आणि मालवणच्या अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र दाजी धामापूरकर यांचे काल गुरुवारी रात्री वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज सकाळी धुरीवाडा येथील कासवकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण धुरीवाडा येथील रहिवासी आणि तळगावचे सुपुत्र रवींद्र दाजी धामापूरकर यांचा जन्म २९ एप्रिल १९४७ रोजी झाला. रवींद्र धामापूरकर…

Read Full News

समाजसेवेचे व्रत जोपासा…

जि. प. सदस्य रुपेश पावसकर:कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन.. ⚡मालवण ता.१२-:शिक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणातूनच भविष्यातील समाज घडणार आहे. शिक्षणातून तुमची प्रगती नक्कीच होईल तुम्ही यशाच्या शिखरावर पोचणार पण हे सर्व मिळविताना आपल्या समाजाचा विसर पडू देऊ नका आपण…

Read Full News

सिंधुदुर्गच्या सागरी सुरक्षेला बळ; ६० मरीन होमगार्डची नियुक्ती…

सहा सागरी पोलीस ठाण्यांत जवान रुजू; किनारपट्टी, बंदरे व जेट्टींच्या सुरक्षेवर राहणार विशेष लक्ष.. ⚡ओरोस, ता. १२-: पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि संवेदनशील सागरी क्षेत्रामुळे राज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने ६० मरीन होमगार्डची नियुक्ती केली आहे. विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या जवानांना आजपासून जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये…

Read Full News

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये…

सावंतवाडी मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची फेरनिवड; कणकवलीची धुरा सुशांत नाईक यांच्या खांद्यावर.. ⚡सावंतवाडी ता.१२-:आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत पक्षबांधणीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची पुन्हा फेरनिवड केली असून, युवासेनेचे आक्रमक…

Read Full News

कला क्षेत्रात चिंदर गावातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा…

गणेश अपराज:चिंदरमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.१२-:स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा ताळमेळ साधून विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील क्षेत्राची निवड करावी. फक्त इतरांचे अनुकरण न करता, स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये ओळखून निर्णय घेतल्यास करिअरमध्ये आनंद आणि यश दोन्ही मिळतात. कला क्षेत्रात काम करण्यासाठी सध्या पेंटर पासून मोठ्या आर्टीस्ट पर्यंत खूप संधी उपलब्ध असून…

Read Full News

कोळंब येथे १४ रोजी ‘फार्मर आयडी’ शिबीर..

⚡मालवण ता.१२-:कोळंब तलाठी कार्यालय यांच्यावतीने शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card) काढण्यासाठी रविवार दि. १४ जून रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कोळंबं येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. कोळंब तलाठी सजामधील महसुली गावांतील ज्या शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी अद्याप शिल्लक आहे, त्यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page