मायकल डिसोजा :२०० स्क्वेअर फूट जागेसाठी १५ दिवसांचे १.८० लाख भाडे;
⚡सावंतवाडी ता.१२-: १५ दिवसांकरिता २०० स्क्वेअर फूट जागेच नगराध्यक्षांनी १ लाख ८० हजार भाड आमच्याकडे मागितल. एक महिन्यासाठी हा रेट ३ लाख ६० हजार होत असून हे भाड अमेरिकेच आहे. नगराध्यक्षांची वागणूक अमेरिकेच्या ट्रम्प सारखी असून उपनगराध्यक्षांनी शेरा मारला म्हणून हे त्यांनी केल आहे. आज शहराची वाट त्यांनी लावली आहे. ठेकेदारांसोबतचे यांचे ऑडिओ, व्हिडिओ आमच्याकडे असून कोण कुठे बसून काय करतो हे सगळं बाहेर काढावं लागेल असाही इशारा जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला. तर याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंच लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. डिसोजा म्हणाले ,
शहरात ग्रो बीग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भारतातील मल्टीनॅशनल कंपन्यांच आऊटसोर्सिंग करण्याच काम आम्ही दोन वर्ष करत आहोत. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६० मुलांना रोजगार देत आहोत. भविष्यात आणखीन २५० नवीन मुलांना नोकरी देण्याचा आमचे प्रयत्न आहेत. इथले युवक आत्महत्या करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमचा हा पुढाकार आहे. सध्या १६० मुलांना आम्ही रोजगार देत असून १ हजार मुलांना रोजगार देण्याचा आमचा उद्देश आहे. ते देखील आम्ही लवकरच पुर्ण करणार आहोत. आज बजाजकडूनही ५० जागांच ॲप्रृव्हल मिळाल असताना यासाठी शहरात जागा आवश्यक असल्याने आम्ही प्रयत्नशील होतो. यातच नगरपरिषदेच्या एका रिक्त जागेत आम्हाला संधी द्यावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. यावेळी रोजगारासाठी प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी कमीतकमी भाडेतत्त्वावर ही जागा देण्यास सांगितले. मात्र, नंतर नगराध्यक्षा आल्या अन् आम्हाला बोलावून घेतलं. २०० स्वेअर फुट जागेसाठी १ लाख ८० हजार रूपयांची मागणी त्यांनी केली. १५ दिवसांकरीता हा रेट असून एका महिन्यासाठी ३ लाख ६० हजार एका महिन्याच भाडे सांगितल. आम्हाला गरज असल्याने आज १५ दिवसांसाठी ५९ हजार आम्ही भरले असून हे सध्या अमेरिकेतल भाड आहे. आमच्या इथली मूल गरीब असून त्यांना रोजगार मिळाला यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यात आज नगराध्यक्षांनी सेंटरला भेट दिली. मुलं इथला टॉईलेट कसा वापरतात ? असा सवाल करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आता मुलं टॉईलेटला तिथे जाणार नाहीत तर घरी जातील का ? असा सवाल श्री. डिसोजा यांनी केला.
दरम्यान, त्यांचा सगळा लक्ष फक्त टक्केवारीवर आहे. आमच्या कंपनीकडून त्यांना तशीच अपेक्षा होती. इथे भेटा, युवराजांना भेट असंही सांगितलं गेल. मात्र, यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाच रान केलं. यांच्यासाठी लोकांचे पाय धरले. पण, आज आम्हालाच अशी वागणूक मिळत आहे. सावंतवाडी शहराची वाट लावण्याच काम यांनी केलं आहे. हे कुठे कुठे कमिशन मागतात ? बैठका घेतात ? याच्या सगळे क्लिप आमच्याकडे आहेत. इथल्या विकासकामावर यांच लक्ष नाही. उपनगराध्यक्षांनी मार्चमध्ये काम थांबवण्यासाठी सांगितलेल असताना आजही काम सुरू आहेत. सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होत आहे. तर दुसरीकडे रोजगारासाठी आम्ही प्रयत्नशील असताना सहकार्य न करता लॉक मारण्याचा इशारा दिला जात आहे. ६० मुलं आतमध्ये असताना लॉक मारण्याचा इशारा त्यांनी दिला. मात्र, आम्ही त्याला जुमानलो नाही. तर याच सेंटरमध्ये गेली ६ वर्ष मुंबई विद्यापीठाच केंद्र असून एक रुपया भाड घेतलं जात नाही. देशात नाही एवढं भाड आम्हाला सांगितले जात आहे. ही जागा कायमस्वरूपी मिळण्यासाठी आम्ही पत्र दिलं आहे. नगरपरिषद बैठकीत यावर चर्चाही होणार होती. मात्र, १५ दिवसांचे ६० हजार भरून घेतले आहे. आमची कंपनी रजिस्टर असून स्कील इंडियाच्या माध्यमातून देखील आम्ही मागणी केली होती.
दरम्यान, ठेकेदारासोबतचे यांचे ऑडीओ, व्हिडिओ आमच्याकडे आहेत. वेळप्रसंगी भांडाफोडही करू, इलेक्शनसाठी पैसा खर्च केला म्हणून ते हे पैसे मागत आहेत. मात्र, निवडणूकीत यांनी एकही रूपया हे खर्च केला नाहीत. ज्यांनी केला त्यांना ते विचारत सुद्धा नाहीत. प्रत्येक कामात यांचे भ्रष्टाचार असून टक्केवारी घेऊन काम केलीत. त्यामुळे उद्यापासून त्याचा पंचनामा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करणार आहोत. एकुण २५ क्लिप आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत. सगळी जंत्री आमच्याकडे आहे. कोण, कुठे बसून काय करतो ? हे सगळं ठाऊक आहे. नगराध्यक्षांच्या घरातील व्यक्तीकडून हे होत आहे. हॉस्पिटलची जागा न दिल्याने लोकांचे मृत्यू होत आहेत. ज्या जागा दिल्यात त्या यांच्या पुर्वजांनी दिल्यात. यांना जमिनी सोडवून पाहिजेत त्यासाठी हॉस्पिटलला जमिन देत नाहीत. आमच्या सेंटरची मागणी सगळ्या नगरसेवकांना मान्य होती. यासाठीची बैठक होऊन नगरपरिषदेत ठराव होणार आहे. उपनगराध्यक्षही राजी असताना त्यांनी शेरा मारला म्हणून नगराध्यक्षांकडून हे होत आहे. ही हुकुमशाही सहन करणार नाही. सावंतवाडीची संस्कृती बिघडण्याच काम नगराध्यक्षा करत आहेत. अमेरिकेतील ट्रम्प सारखी त्यांची वागणूक असून राजवाड्याचे आम्ही पाईक आहोत, देव पाटेकराला आम्ही मानतो. माझे आरोप खोटे असतील तर त्यांनी देव पाटेकर समोर यावे. यापुढे जर आम्हाला त्रास झाला तर शहरात होर्डिंग्ज लावून भांडाफोड करू असा इशारा दिला. व्यावसायिक दर आम्ही भरायला तयार आहोत. पण, हा रेट अमेरिकेचा आहे, तो योग्य नाही. पैसे जास्त सांगून यांना पैसे देऊन दर कमी करून देण्याची यांची पॉलिसी आहे. मात्र, आम्ही एकही रूपया त्यांना देणार नाही, सरकराचे पैसे भरू. आज लॉक मारायला आम्ही दिलं नाही. त्यात हा रोजगाचा प्रश्न असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश यांचे या सगळ्यांबाबत लक्ष वेधणार आहे अशी माहिती ग्रो बीग टेक्नॉलॉजी संचालक, जि.प. सदस्य मायकल डिसोजा यांनी दिली. ग्रो बीग टेक्नॉलॉजी संचालक सुशांत पास्ते उपस्थित होते
