⚡सावंतवाडी ता.१२-: ओरोस येथील एनसीसीच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या छात्रसैनिकांनी वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक आणि सांघिक क्रीडा प्रकारात उपविजेतेपद मिळवून उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला.
वक्तृत्व स्पर्धेत कॅडेट दुर्वांग वालावलकर आणि कॅडेट कनिष्का जळवी यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर सांघिक क्रीडा प्रकारात कॅडेट राजदीप बांदेलकर आणि कॅडेट अक्षरा गवळी यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवत हे यश संपादन केले. या कामगिरीबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज आणि लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
.
कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या छात्रसैनिकांची एनसीसी शिबिरात चमकदार कामगिरी..
