कोळंब येथे १४ रोजी ‘फार्मर आयडी’ शिबीर..

⚡मालवण ता.१२-:
कोळंब तलाठी कार्यालय यांच्यावतीने शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card) काढण्यासाठी रविवार दि. १४ जून रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कोळंबं येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

कोळंब तलाठी सजामधील महसुली गावांतील ज्या शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी अद्याप शिल्लक आहे, त्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली अंगीकृत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ओळखपत्र शिबिरासाठी येताना लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक (ओटीपीसाठी) तसेच सातबारा उतारा किंवा ८-अ चा उतारा सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page