आरोंदा येथे २० रोजी दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव समारंभ…

⚡सावंतवाडी ता.१२-: मोहन भोगले प्रतिष्ठान ,आरोंदा यांच्या वतीने मार्च २०२६ मधील यशस्वी झालेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २० जून रोजी सायंकाळी ठीक ४.३० वा.आरोंदा ग्रामोन्नती मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार असून,या समारंभात देण्यात येणारे पुरस्कार पुढील प्रमाणे:-
डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत पत्नी स्व. सौ. पुष्पा प्रभाकर नाईक स्मृती प्रित्यर्थ “तेजस्वी /तेजस्विनी पुरस्कार” हा पुरस्कार सावंतवाडी तालुक्यात १० वी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान यात .मार्च २०२६ ची मानकरी कु. भार्गवी अंकुश शेटवे (१००%), मिलाग्रीस हायस्कुल, सावंतवाडी
रोख रु. २५,०००/-

डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत” चेतना” पुरस्कार:-
आरोंदा गावातील विद्यार्थी/विद्यार्थीनींचा सन्मान ,आई स्व. सौ. अनसूया यशवंत नाईक व वडील स्व. श्री. यशवंत तुकाराम नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथम क्रमांक
रोख रु. २५,०০০/-

आजी स्व. सुभद्रा तुकाराम नाईक व आजोबा स्व. तुकाराम लक्ष्मण नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथम क्रमांक रोख रु. २५,०००/-

बंधू स्व.रमाकांत यशवंत नाईक स्मृतीप्रित्यर्थ, द्वितीय क्रमांक रोख रु. २०,०००/- तृतीय क्रमांक रोख रु. १५,०००/-

श्रीम. स्मिता शशिकांत भोगले पुरस्कृत,”सुकन्या पुरस्कार”:-
गावातील प्रथम आलेल्या ५ मुलींचा सन्मान रोख रु. ५००/-

यश केरकर पुरस्कृत कै. श्यामा जगन्नाथ केरकर स्मरणार्थ यशवंत पुरस्कार:-
आरोंदा हायस्कूल मधून ७५% हून कमी गुण मिळवून यशस्वी झालेल्या पहिल्या एका विद्यार्थ्यांचा सन्मान. रोख रु. ५००/-

स्व. रघुवीर (नाना) गावडे स्मृती प्रयास पुरस्कार:-
आरोंदा हायस्कूल मधून ७५% हून कमी गुण निळवून यशस्वी झालेल्या दोन विद्यार्थ्यांचा सन्मान
रोख रु. ५००/-

श्रीम.शुभांगी कुबडे पुरस्कृत श्यामसुंदर कुबडे स्मृती पुरस्कार:-
आरोंदा हायस्कूल मधील प्रथम आलेल्या ५ विद्यार्थ्यांचा सन्मान
रोख रु. ५००/-

सिसिलिया लोबो पुरस्कृत प्रेरणा पुरस्कार:-
आरोंदा हायस्कूल मधून ८०% हून कमी गुण मिळवून यशस्वी झालेल्या पहिला तीन विद्यार्थ्यांचा सन्मान रोख रु ५००/-

मोहन भोगले पुरस्कृत रोख पुरस्कार:-
आरोंदा गावातील ८०% व अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान रोख रु. १०००/-

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले असून,
वरील समारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश परब यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमास एसपीके कॉलेज, सावंतवाडीच्या प्राध्यापिका निलम धुरी यांचे सुत्रसंचालन लाभणार आहे.

बक्षिसपात्र विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठानचे व्यवस्थापक चेतन आरोसकर ८८०६५६२५०८ यांच्याशी संपर्क साधवा .
विद्यार्थी अथवा पालक या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास समारंभ संपल्यानंतर कोणाही विद्यार्थ्याला पारितोषिक देण्यात येणार नसल्यामुळे,सदरील विद्यार्थी पालक यांनी वेळीच उपस्थित रहावे.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष संदेश परब,खजिनदार – आगुस्तीन फर्नांडीस,सचिव रामदास पेडणेकर,विश्वस्त आनंद नाईक,
प्रतिक गावडे यांनी सदरील कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page