कला क्षेत्रात चिंदर गावातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा…

गणेश अपराज:चिंदरमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..

⚡मालवण ता.१२-:
स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा ताळमेळ साधून विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील क्षेत्राची निवड करावी. फक्त इतरांचे अनुकरण न करता, स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये ओळखून निर्णय घेतल्यास करिअरमध्ये आनंद आणि यश दोन्ही मिळतात. कला क्षेत्रात काम करण्यासाठी सध्या पेंटर पासून मोठ्या आर्टीस्ट पर्यंत खूप संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अशा क्षेत्राकडे वळल्यास त्यासाठी आपली नेहमीच सहकार्याची भूमिका राहिल. कला क्षेत्रात चिंदर गावातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा, असे प्रतिपादन मुंबईस्थित कला शिक्षक गणेश अपराज यांनी चिंदर येथे बोलताना केले.

श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर आयोजित व सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई पुरस्कृत चिंदर गावातील इयत्ता दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा चिंदर शाळा नं. १ येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, विद्येची देवता श्री देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावजी तावडे यांनी केले.

इयत्ता दहावी मधून चिंदर गावातून प्रथम आलेल्या उर्वशी चंद्रसेन पारकर, व्दितीय ॲरोन संतान्तो फर्नांडिस व धनश्री गिरीश भावे तसेच बारावी मधून प्रथम राजश्री धनाजी बारंगळे, व्दितीय रिद्धी संतोष अपराज, तृतीय गौरव रणजित दत्तदास, सी.बी. एस.ई मधून दहावी मधील दुर्गा श्रीपाद म्हापसेकर यांच्यासह गावातील ४३ विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक मुंबई स्थित कलाशिक्षक गणेश अपराज, मराठा रेजिमेंट आर्मीचे हवालदार वं चिंदर आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक संतोष सावंत, वाचनालयाचे अध्यक्ष व सुविद्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉज मुंबईचे संचालक प्रकाश मेस्त्री, माजी सभापती हिमाली अमरे, वाचनालय उपाध्यक्ष संतोष पाताडे, ग्रंथपाल स्वरा पालकर, शशिकांत नाटेकर, मोरेश्वर गोसावी, गोपाळ चिंदरकर, संतोष अपराज, गजानन पाटणकर, सागर अपराज, सतांन्तो फर्नांडिस, अजित लब्दे, विनायक मसुरकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, प्रतिक्षा पालकर-माडये, चिन्मयी पाताडे, हर्षद बेनाडे, जान्हवी घाडी, संजय भावे, रणजित दत्तदास आदी उपस्थित होते.

यावेळी संतोष सावंत, प्रकाश मेस्त्री, शशिकांत नाटेकर, हिमाली अमरे यांनीही मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्था सहसचिव सिध्देश गोलतकर यांनी मानले.

You cannot copy content of this page