ओसरगाव येथील कार-मोटरसायकल अपघातात कणकवलीतील युवक ठार

कणकवली ता.११-:*मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील असरोडी फाट्यानजीक  इको कारने पल्सर मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने आज सायंकाळी ७.३० भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसन्ना उर्फ बाळा प्रकाश मुलुष्ठे(वय -४१ रा-कणकवली,मारुतीआळी) हा युवक जागीच ठार झाला.तर मागे बसलेले अभि अशोक आचरेकर(वय-४३) किरकोळ जखमी झाले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.अपघाताचे वृत्त समजताच उपजिल्हा रुग्णालयात…

Read More

करूळ घाटाच्या डागडुजीच्या दर्जा बाबत तडजोड खपवून घेणार नाही

आम राणे यांनी दिला खणखणीत इशारा वैभववाडी प्रतिनिधी करुळ घाट हा रहदारीच्या दृष्टीने कोकण व घाटमाथा यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. घाटात सुरू असलेल्या डागडुजी कामाच्या दर्जाबाबत तडजोड अजिबात खपवून घेणार नाही. असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला. करूळ घाट कामाबाबतचा आढावा येथील तहसील कार्यालयात आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला….

Read More

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारामुळे मालवणच्या सभापती, उपसभापतीसह प्रशासनाने व्यक्त केला आनंद

मालवण ता.११-:* केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मालवण पंचायत समितीला जाहीर झाल्यानंतर मालवणचे माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे तर सन २०२०-२१ या वर्षामध्ये मालवण पंचायत समितीने शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याने आणि या योजना राबविण्यासाठी प्रशासनाला सभापती आणि उपसभापती यांच्या बरोबरच…

Read More

इंधन बचत ही काळाची गरज

आय. टी. आय. निर्देशक वैभव झोरे यांचे प्रतिपादन;सावंतवाडी आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमात मार्गदर्शन सावंतवाडी ता.११-:* चालकांनी आपली सेवा बजावीत असताना प्रवासी चढउतार करताना गाडी चालू बंद करणे तसेच योग्य त्या ठिकाणी आवश्यक त्या गिअरचा वापर करणे गरजेचे असून इंधन बचत ही काळाची गरज आहे इंधन बचतीमुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडते त्याचबरोबर राष्ट्रीय इंधन बचतीस…

Read More

टेम्पोतील गुरांच्या आडून गोवा बनावटीची दारूच्या वाहतूकीवर पोलिसांची कारवाई…

दोघेजण ताब्यात;साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी ता.११-:* बावळाट मार्गे आंबोली येथून कोल्हापूर येथे गुरांच्या आडून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर टेम्पोवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री 12 30 च्या सुमारास बावळाट तिठ्यावर करण्यात आली.यात दोघा संशयितांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More

असगणी जि प शाळेत शिक्षक मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

ग्रामस्थांनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांची भेट. मालवण ता.११-:* मालवण तालुक्यातील असगणी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगणी नं. १ या शाळेत पुरेशी पटसंख्या असतानाही शाळेत फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत मालवण तालुक्यात विशेषतः असगणीच्या परिसरातील कमी पटसंख्या असणाऱ्या काही शाळांमध्ये चार ते पाच शिक्षक दिले आहेत मात्र, अजगणी शाळेतच कमी शिक्षक कार्यरत असल्याने मुलांच्या शैक्षणिक…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे २१ रोजी आरोग्य शिबीर

मालवण ता.११-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत प्रत्येक तालुक्यात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असून या अंतर्गत दि. २१ एप्रिल रोजी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य शिबीर होणार आहे. यात विविध प्रकारच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य निदान व प्राथमिक…

Read More

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश काटे यांचा भाजप मध्ये प्रवेश…

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश वैभववाडी प्रतिनिधी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री प्रकाश सखाराम काटे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले आहे. यावेळी प्रकाश काटे यांचे बंधू उद्योजक दत्ता काटे हेही उपस्थित होते. प्रकाश काटे हे सांगुळवाडी…

Read More

तेली समाज उन्नती मंडळाची १५ रोजी सभा

मालवण ता.११-:* मालवण तालुका तेली समाज उन्नती मंडळाची सभा १५ एप्रिल रोजी श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर देऊळवाडा येथे दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष राजन आचरेकर व सचिव मंगेश शेर्लेकर उपस्थित राहणार आहेत. सर्व पदाधिकारी व सभासद यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

रिफायनरीचे महत्त्व ना.आदित्य ठाकरे यांना समजले मग खास.राऊतांना का नाही समजले?

प्रमोद जठार यांचा सवाल; महाविकास सरकारच्या काळात खुद्द पवार कुटुंबीय असुरक्षित कणकवली ता.११-:* पाच वर्षांनंतर का होईना रिफायनरी प्रकल्प होत आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे सांगितले त्यामुळे आता तरी शिवसेनेच्या खास.विनायक राऊत यांनी रिफायनरीला समर्थन द्यावे. रिफायनरी प्रकल्पाचे महत्त्व राज्याच्या पर्यावरण मंत्री यांना समजले मात्र ते खास.राऊताना…

Read More
You cannot copy content of this page