ओसरगाव येथील कार-मोटरसायकल अपघातात कणकवलीतील युवक ठार

कणकवली ता.११-:*मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील असरोडी फाट्यानजीक  इको कारने पल्सर मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने आज सायंकाळी ७.३० भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसन्ना उर्फ बाळा प्रकाश मुलुष्ठे(वय -४१ रा-कणकवली,मारुतीआळी) हा युवक जागीच ठार झाला.तर मागे बसलेले अभि अशोक आचरेकर(वय-४३) किरकोळ जखमी झाले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.अपघाताचे वृत्त समजताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाळा प्रकाश मुलुष्ठे हे आपल्या मित्रांसोबत ओसरगाव येथे पल्सर मोटरसायकल (एम-एच ०७-के-७६९६) घेऊन व्यवसायानिमित्त गेले होते.तेथुन कणकवलीला परत येत असताना मागावून भरधाव येणाऱ्या इको कारने जोरदारपणे धडक दिली. हा अपघात सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला असून मोटर सायकलस्वार बाळा मुलुष्ठे यांचा जागीच मृत्यू झाला असून कार चालक भरधाव वेगाने तिथून अपघात झाल्यानंतर पसार होता. त्या कारची नितीन धुरी या युवकाने केली, काही अंतरावर कार करण्यात आल्याचे समजते.
अपघाताचे वृत्त समजताच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक मेघा गांगण, कन्हैया पारकर, विराज भोसले,  संजय  कामतेकर,बँक संचालिका प्रज्ञा ढवण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, बाळा माणगावकर, दामोदर सावंत,  सुशील आळवे, मुन्ना नार्वेकर, राजन परब,संजय मालडकर, सचिन म्हाडगूत ,प्रसाद अंधारी,सोहंम वाळके,राजुशेठ गवाणकर, निलेश आजगावकर, बंटी तहसीलदार आदींसह कणकवली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page