आय. टी. आय. निर्देशक वैभव झोरे यांचे प्रतिपादन;सावंतवाडी आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमात मार्गदर्शन
सावंतवाडी ता.११-:* चालकांनी आपली सेवा बजावीत असताना प्रवासी चढउतार करताना गाडी चालू बंद करणे तसेच योग्य त्या ठिकाणी आवश्यक त्या गिअरचा वापर करणे गरजेचे असून इंधन बचत ही काळाची गरज आहे इंधन बचतीमुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडते त्याचबरोबर राष्ट्रीय इंधन बचतीस हातभार लागतो अशा प्रकारचे मार्गदर्शन आय टी आय चे निर्देशक वैभव झोरे यांनी केले.तर बदलत्या युगानुसार नवीन तंत्रणयानाच्या वाहने येत असून त्या संदर्भात देखील मार्गदर्शन विष्णू सावंत यांनी केले.
येथील आगरात आज इंधन बचत मासिक कार्यक्रम पार पडला यावेळी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे, स्थानक प्रमुख संकेत पवार, कार्यशाळा प्रमुख संदीप मोहिते, मुख्य लिपिक अरुण पवार आदी कर्मचारी वाहक चालक आदी उपस्थित होते या मासिक इंधन बचत कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यानंतर आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे आणि कार्यशाळा प्रमुख संदीप मोहिते यांनी मार्गदर्शन केले
