टेम्पोतील गुरांच्या आडून गोवा बनावटीची दारूच्या वाहतूकीवर पोलिसांची कारवाई…

दोघेजण ताब्यात;साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी ता.११-:* बावळाट मार्गे आंबोली येथून कोल्हापूर येथे गुरांच्या आडून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर टेम्पोवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री 12 30 च्या सुमारास बावळाट तिठ्यावर करण्यात आली.यात दोघा संशयितांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनोज दत्तात्रय पोवार 27, दत्तात्रय रामचंद्र हिवाळे 36 दोन्ही रा कोल्हापूर शिलोळी असे त्या दोघी संशयितांची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की पोवार व हिवाळे हे आपल्या ताब्यातील महेंद्र बोलेरो पिकअप घेऊन बांदा येथून बावळात मार्गे कोल्हापूर च्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत होते बावळाट मार्गे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सावंतवाडी वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी बावळाट तिठा येथे धाव घेत सहकाऱ्यांच्या मदतीने त्या टेम्पो चालकाला अडवले यावेळी त्या टेम्पोची पडताळणी केली असता प्रथम दर्शनी हौड्यात 2 गुरे व गवत आढळून आले. यानंतर गुरांच्या मागे असलेल्या गवतात गोवा बनावटीच्या दारूचे एकूण 10 बॉक्स आढळून आले त्यानंतर त्यावर कारवाई करत 39 हजाराच्या गोवा बनावटीच्या दारु व 4 लाख च्या टेम्पो सह एकूण 4 लाख 39 रु मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सावंतवाडी वाहतूक शाखेचे राजा राणे, रामचंद्र साटेलकर, सुनिल नाईक,जिल्हा वाहतूक शाखेचे आबा पिळणकर, महेंद्र बांदेकर यांनी केले.

You cannot copy content of this page