रिफायनरीचे महत्त्व ना.आदित्य ठाकरे यांना समजले मग खास.राऊतांना का नाही समजले?

प्रमोद जठार यांचा सवाल; महाविकास सरकारच्या काळात खुद्द पवार कुटुंबीय असुरक्षित

कणकवली ता.११-:* पाच वर्षांनंतर का होईना रिफायनरी प्रकल्प होत आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे सांगितले त्यामुळे आता तरी शिवसेनेच्या खास.विनायक राऊत यांनी रिफायनरीला समर्थन द्यावे. रिफायनरी प्रकल्पाचे महत्त्व राज्याच्या पर्यावरण मंत्री यांना समजले मात्र ते खास.राऊताना समजण्यासाठी पाच वर्षे लागली असल्याचा टोला भाजपचे प्रदेश सचिव माजी आम.प्रमोद जठार यांनी लगावला

कणकवली येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेश सचिव माजी आम.प्रमोद जठार बोलत होते. एसटीच्या विलनिकरण प्रश्नांवर जे मोर्चेकरी खा.शरद पवार यांच्या घरावर चालून गेले,ती गोष्ट निषेधार्ह आहे. परंतु गेले ५ महिने एसटी महामंडळ ,कर्मचारी व अवलंबून असलेली ग्रामीण भागातील जनता यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उद्रेक महाराष्ट्राने पाहिला. तसेच

.तसेच महाविकास सरकारच्या काळात खुद्द पवार कुटुंबीय,शेतकरी, सामान्य जनता असुरक्षित आहे,हेही पहायला मिळाले असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्वी सांगायचे ,सहाव्या मजल्यावरून मंत्री मोर्चा किंवा आंदोलनकर्त्याना सामोरे जातील.दुस्तरखुर्द स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झालेत तरी सुद्धा एसटी कर्मचारी ५ महिने रस्त्यावर आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीने २५ हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला.त्यात एसटी विलीकरणासाठी ५ हजार कोटींचा तूट वाढली असती.तर सरकारचे बा काय गेले असते?.आमदारांना घरे,गाड्या व बजेट मध्ये विकासासाठी ५ कोटी रुपये दिले.

त्याउलट दर महिन्याला महाविकास आघाडीचे गृहमंत्री मुंबईतुन वसूल करणारे १०० कोटी ,रस्त्यात पैसे,धरणात पैसे खाता, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी असे पाऊल उचलले. या देशातील दोन खासदार घरात राहत होते,त्या मध्ये एक महाविकास आघाडी सरकारचे निर्माते आहेत त्यांच्या घराचे मुबंई पोलीस रक्षण करु शकत नाही. हे सरकारचे अपयश आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २४ तास देणारे मुख्यमंत्री नाहीत,पार्ट टाईम मुख्यमंत्री नको.नाईलाजाने राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे.महाविकास आघाडीने पुर्णवेळ मुख्यमंत्री करावा,नाहीतर राष्ट्रपतीच्या हवाली राज्य करावे,असे नाईलाजाने सांगावे लागत आहे,असे श्री.जठार यांनी सांगितले.

रिफायनरी राजापूर तालुक्यातील धोपेश्वर,बारसु या ठिकाणी होणार आहे.पुढील आठवड्यात नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना भेटणार आहोत. रोजगार,विकास कसा करायचा?विजयदुर्ग पोर्ट विकास करा करायचा? याबद्दल चर्चा होईल. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ हजार गावे आहेत, प्रत्येक गावातील २० लोकांना नोकरी दिली जाणार आहे.मी दलाल म्हणतात,त्यांनी शोध घ्यावा.नुसता आरोप नको.रिफायनरी हा विषय समज पटायला शिवसेनेची ५ वर्षे गेली.आता ना.उदय सामंत सांगताहेत. रिफायनरी प्रकल्प हवा आहे.जनतेचे सत्तेत आहेत त्यांनी प्रबोधन केले पाहिजे.केंद्र सरकारचा प्रकल्प आहे,नोडल एजन्सी राज्य सरकार आहे. जीएसटी ६० हजार कोटी मिळणार आहे,त्यात ५० टक्के राज्याला जीएसटी मिळणार आहे.इकॉनॉमी वाढला असता,त्याचा फायदा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना होईल. असे प्रमोद जठार म्हणाले.

You cannot copy content of this page