माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांची उपस्थिती;राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचा उपक्रम
सावंतवाडी ता.११-:शहरातील राजा शिवाजी चौक येथे राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने नुतनीकरण करण्यात आलेल्या भगव्या ध्वज स्तंभाचा लोकार्पण सोहळा आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसकर, दिलीप पवार, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ माजी नगरसेवक सुरेश भोकटे ,माजी नगरसेवीका दिपाली भालेकर,दिलीप भालेकर,संजू शिरोडकर,जय भालेकर,ओंकार भालेकर,प्रदिप भालेकर,आदी उपस्थित होते.
