बोरचार्जर कोरड्या विंधन विहिरींसाठी उत्तम पर्याय

अर्चना घारे परब यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी केली चर्चा

सावंतवाडी ता.११-:* बोरचार्जर हा भारतातील पाण्याची कमतरता असलेल्या भागात कोरड्या पडलेल्या पिण्याच्या घरगुती आणि सिंचनाच्या बोरवेलला पुनरूज्जीवित करण्याचा एक जलद परवडणारा आणि स्मार्ट मार्ग आहे. हा उपक्रम सर्वांसाठीच फायदेशीर असून या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली आज पदाधिकाऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली यावेळी मंत्री जयंत पाटील यांना या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

हा उपक्रम राज्यभरात राबवल्या शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल बोअरचार्जर मुळे पंपिंग वेळेत वाढ, पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होते आणि पाणीपुरवठ्याची आयुष्य वाढते या सर्वांचा परिणाम म्हणजे शेतीचे उत्पन्न वाढत होते.

You cannot copy content of this page