केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली स्पर्धा
मालवण ता.११-:* केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे नेते ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने खास महिलांसाठी घेण्यात आलेल्या सी फूड पाककला स्पर्धेत सौ. तारका हरी चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावितानाच मानाच्या पैठणीवर आपले नाव कोरतानाच मालवणच्या नेरुरकर ज्वेलर्स पुरस्कृत सोन्याची नथीच्या त्या मानकरी बनल्या
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली मामा वरेरकर नाट्यगृह येथे महिलांसाठी मच्छीवर आधारित सी फूड पाककला स्पर्धा व फनी गेम्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मालवण शहर अध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग घेत विविध पाककृती सादर केल्या. बांगडा, पेडवे म्हाकुल, खेकडा, कोलंबी यांचा समावेश असलेल्या विविध मसालेदार, चमचमीत आणि नाविन्यपूर्ण पाककृती लक्षवेधी ठरल्या. स्पर्धेचे परीक्षण माता वैष्णोदेवी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्या समीर तारी, प्राध्यापक प्रथमेश ठाकूर, प्राध्यापक सूरज शेटकर यांनी केले. त्यांना हॉटेल व्यावसायिक मेघा सावंत, संजय गावडे यांचे सहकार्य लाभले. सी फूड्स पाककला स्पर्धेत स्वाती सचिन हडकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
त्यांना द्वितीय क्रमांकाची मानाची पैठणी देतानाच मालवणच्या हॉटेल बांबू पुरस्कृत चांदीचा छल्ला देऊन त्यांना गौरविण्यात आले. तर सिद्धी परब यांनी तृतीय क्रमांक मिळवला, त्यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. फनी गेम्स स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:- बादलीत बॉल टाकणे- प्रथम- आर्या अभय गावकर, द्वितीय- मोहिनी हनुमंत गावकर, स्ट्रॉ केसात लावणे- प्रथम- आर्या अभय गावकर, द्वितीय- अपूर्वा अभिजित खानोलकर, तृतीय- एका काडीत मेणबत्त्या लावणे- प्रथम- नमिता धामापूरकर, द्वितीय- सुवर्णा चव्हाण, संगीत खुर्ची- प्रथम- श्रेया सागर मांजरेकर, द्वितीय- संजना हरिश्चंद्र मांजरेकर, चिठ्ठी टाकणे- प्रथम- संगीता नितीन तायशेटे, द्वितीय- श्रद्धा सचिन हडकर. फनी गेम्स मधील विजेत्यांना देखील आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दीपक पाटकर, महिला शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, परीक्षक प्राचार्या संजय तारी, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, हॉटेल व्यावसायिक संजय गावडे, मेघा सावंत, आबा हडकर, नाना साईल, प्रमोद करलकर, देविदास वेरलकर आदी व इतर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. *केक कापून वाढदिवस साजरा* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली सी फुडस वर आधारित पाककला आणि फनी गेम स्पर्धा पार पडल्यानंतर भाजप महिला आघाडीच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला
