वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात…
सावंतवाडी ता.१०-:लोडशेडींगच्या वादातून विज अधिकारी व कर्मचारी यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी आज आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. तर आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली आहे.
