Headlines

ना.नारायण राणे व खास. विनायक राऊत यांनी टेंडर प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्यानेच टोलमध्ये घोळ

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप;ठेकेदार कंपनीने घातलेला घाट संशयास्पद कणकवली ता.३०-:* मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्याचा टोल वसुलीचा ठेका आंध्रप्रदेशातील एमडी कनोमिसा या कंपनीला देण्यात आला आहे .या कंपनीने आता प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांमध्ये प्रतिदिन 6 लाख 53 हजार 894 रुपये इतका टोल वसूल करावा अशी सूचना आहे. मात्र पावसाळी तीन महिन्याच्या कालावधीत…

Read More

स्ट्रीटलाईट 8 दिवसात सुरु न झाल्यास जनआंदोलन उभारणार

कणकवली तालुका सरपंच संघटनेने विज वितरणला दिला इशारा कणकवली ता.३०-:* कणकवली तालुक्यातील गावात स्ट्रीट लाईटचा विद्युत पुरवठा गेले आठ दिवस बंद आहे.त्यामुळे कणकवली सरपंच संघटनेच्यावतीने कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी व वीज वितरण अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी सरपंच यांनी गावातील स्ट्रीट लाईट संदर्भात आपले निवेदन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व महावितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते…

Read More

बांदा आठवडा बाजारात पाकीट मारी

वाफोली येथील वृध्द चाकमान्यांला बसला फटका बांदा/प्रतिनिधी बांदा बाजारपेठेत आज आठवडा बाजारात मध्यप्रदेशातील दोन भामट्यांनी मुंबईतील चाकरमान्यांचे पाकीट लंपास केले. कट्टा कॉर्नर येथील नाना शिरोडकर यांच्या भुसारी दुकानातील गर्दीचा फायदा घेत या चोरट्यांनी पाकीट लंपास करुन तेथून पोबारा केला. वाफोली येथील त्या वृद्ध चाकरमान्यांना काही वेळातच पाकीट नसल्याचे लक्षात आले. शिरोडकर यांच्या दुकानातील सीसीटीव्ही चेक…

Read More

मराठा समाजाला योजनांचा लाभ देण्यास प्रशासन करतेय टाळाटाळ

मराठा समाजाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट सिंधुदुर्गनगरी ता ३० मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाचा धसका घेत शासनाने मराठा समाजाला लाभ देणारे काही निर्णय घेतले आहेत. मात्र प्रशासनाकडून मराठा समाजासाठी असलेल्या योजना आणि लाभ समाज बांधवांपर्यंत पोचविण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे तरुण आणि विद्यार्थ्यांना अनेक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास…

Read More

स्वच्छता अभियान म्हणजे आरोग्य विभागाचा दिखाऊपणा

माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे यांचा आरोप : सावंतवाडी शहरातील नागरिकांना सहभागी करून घेत नाहीत सावंतवाडी ता.३०-:* शहरात आरोग्य विभागाकडून सुरू असलेले स्वच्छता अभियान हे दिखाऊपणा असल्याचा आरोप माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे यांनी केला आहे. तसेच या कामात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,…

Read More

सिटू संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांच्याकडे केले सादर *⚡ओरोस ता.३०-:* ३० मे या स्थापना दिनानिमित्त सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांना देशातील महागाई, बेरोजगारी कमी करण्यासाठी व आशा गटप्रवर्तक यांच्या समस्या सोडविण्याचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत प्रधानमंत्री, भारत सरकार यांना हे निवेदन देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी…

Read More

महाविकास आघाडी सरकारमुळे गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य

प्रसंगी आंदोलनात्मक पवित्रा घेणार: महेश गुरव कणकवली ता.३०-:* गावागावांमध्ये रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट बिल शासनामार्फत अनुदानाच्या माध्यमातून भरण्यात येत होती मात्र दोन वर्षापूर्वीच्या थकीत बिलांची रक्कम शासनाने दिलेली नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर गावागावात अंधार निर्माण होत आहे. या साऱ्याला राज्य शासनाचा नाकर्तेपणा जबाबदार असून जिल्ह्यातील सत्ताधारी याबाबत मूग गिळून गप्प का? असा सवाल कणकवली पंचायत…

Read More

न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे एस् एस् सी १९९५ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

कणकवली ता.३०-:* न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे एस् एस् सी १९९५ च्या बॅचचा स्नेहमेळावा बरोबर २७ वर्षांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी- शिक्षक यांना जोडणारा दुवा मनीषा कदम आणि किरण सावंत यांनी पार पाडला. यावेळी व्ही. आर. काजरेकर , शिंदे सर, देसाई सर, निंबाळकर सर, पी. व्ही. काजरेकर, सावंत सर आणि शिक्षकेतर बाबू मडव, भिकाजी…

Read More

तुतारी गाडीचा थांबा नांदगाव रेल्वे स्टेशनला पूर्ववत करा

रत्नागिरी येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घेतली भेट कणकवली ता.३०-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्थानक म्हणजे मध्यवर्ती असून नांदगाव दशक्रोशितील नागरिक बरोबरच देवगड तालुका तसेच फोंडाघाट परिसर यांना जवळचे रेल्वेस्थानक आहे. यामुळे सुरुवातीला नांदगाव स्टेशन ला तुतारी गाडीचा थांबा होता. मात्र कोरोना काळात सर्व ठप्प झाल्याने यावेळी तुजला गाडीचा थांबा कमी करण्यात आला होता….

Read More

जीवनात चांगल्या पुस्तकासारखा मित्र नाही, आयुष्यात खूप पुढे जा

पंतप्रधान नरेंद्र मोदी;कोविड 19 मुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 18 बालकांना लाभ किटचे प्रदान सिंधुदुर्गनगरी ता.३०-:* कोवीड-19 मुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 18 बालकांना लाभ व सेवा बाबतच्या किटचे वाटप जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या…

Read More
You cannot copy content of this page