कणकवली तालुका सरपंच संघटनेने विज वितरणला दिला इशारा
कणकवली ता.३०-:* कणकवली तालुक्यातील गावात स्ट्रीट लाईटचा विद्युत पुरवठा गेले आठ दिवस बंद आहे.त्यामुळे कणकवली सरपंच संघटनेच्यावतीने कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी व वीज वितरण अधिकार्यांची भेट घेतली. यावेळी सरपंच यांनी गावातील स्ट्रीट लाईट संदर्भात आपले निवेदन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व महावितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना देत पुढील आठ दिवसात स्टिट लाईट सुरु न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील या सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आला. कणकवली तालुका सरपंच संघटनेच्या वतीने विज अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी मिलिंद मेस्त्री, हेमंत परुळेकर अफ्रोजा नावलेकर,पंढरी वायगणकर, मनाली गुरव, संतोष राणे,सुहास राणे,महेश शिरवलकर,वासुदेव कर्णीक, ऋतिक। सावंत,गीता तेली,आरेकर,सुनिद्र सावंत,गुरुदास चव्हाण,अशोक बोबाटे, सुजाता जाधव,शीतल जाधव,संदीप मेस्त्री, समीर प्रभुगावकर, संदीप सावंत, भाई आंबेरकर, उपस्थित होते कणकवली तालुका सरपंच संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कणकवली तालुक्यातील प्रत्येक ग्रामिण भागातील स्ट्रीट लाईट विज बिल सुरुवातीला जि.प.मार्फत शासनाच्या आलेल्या अनुदानानुसार भरली जात होती.
मात्र मार्च 2019 पासून राज्यशासनाने गेले दोन ते तिन वर्ष ग्रामिण भागातील स्ट्रीट लाईट विज बिलापोटी महावितरण कंपनीला अदा न केल्याने या थकीत बिला पोटी सर्व ग्रामपंचायतीचा विज पुरवठा खंडीत केलेला आहे. प्रत्येक ग्रा.पं.चे जवळपास सरासरी 8 ते 10 लाखापर्यंत असल्याने गेल्या आठवडयापासून विज कन्केशन तोडण्यास सुरुवात केली. आहे. यामुळे ऐन मे महीन्यामध्ये मुंबईकर चाकरमानी तसेच गावातील नागरीकांना गावात फीरताना अधारातून चाचपडत बाहेर पडावे लागत असून संपूर्ण गाव अंधारमय झालेली असुन काळोकाचा फायदा घेत गावोगावात चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्य शासन व महावितरणच्या या भांडणात ग्रामिण भागातील सिंधुदूर्ग पर्यटन असलेला जिल्हयातील ग्रामपंचयात स्तरावरील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रा.पं.सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याना जनतेच्या रोषाला सामोरे जावे जागत आहे. ग्रामिण भागातील जनतेसाठी सर्व सरंपच वेळ पडल्यास जनतेसह रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा कणकवली तालुका सरपंच संघटनेच्यावतीने विज अधिकाऱ्यांना देण्यात आला.
