स्वच्छता अभियान म्हणजे आरोग्य विभागाचा दिखाऊपणा

माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे यांचा आरोप : सावंतवाडी शहरातील नागरिकांना सहभागी करून घेत नाहीत

सावंतवाडी ता.३०-:* शहरात आरोग्य विभागाकडून सुरू असलेले स्वच्छता अभियान हे दिखाऊपणा असल्याचा आरोप माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे यांनी केला आहे. तसेच या कामात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, कालच जुना बाजार येथील वेदांत रेसिडेन्सी येथे कम्युनिटी कंपोस्टिंग युनिट स्वच्छ सर्वेक्षण नुसार लोखंडी फेब्रिकेशन चे भलेमोठे एक स्टेन्ड युनिट त्या इमारतीतील रहिवासी नागरिकांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देताच लावण्यात आले होते. ही बाब तेथील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही बाब माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना संगितीली. यावेळी सुरेश भोगटे यांनी नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी भेट देऊन याबाबत जाब विचारला तसेच तो स्टॅन्ड काढून टाकण्यास भाग पाडले व रहिवाश्यांच्या सांगण्यानुसार दुसऱ्या जागेत तो स्टॅन्ड लावण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी ऑफिस मध्ये बसून न राहता रत्यावर उतरून ग्राउंड लेव्हल ला काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page