न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे एस् एस् सी १९९५ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

कणकवली ता.३०-:* न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे एस् एस् सी १९९५ च्या बॅचचा स्नेहमेळावा बरोबर २७ वर्षांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी- शिक्षक यांना जोडणारा दुवा मनीषा कदम आणि किरण सावंत यांनी पार पाडला. यावेळी व्ही. आर. काजरेकर , शिंदे सर, देसाई सर, निंबाळकर सर, पी. व्ही. काजरेकर, सावंत सर आणि शिक्षकेतर बाबू मडव, भिकाजी चव्हाण, बी. डी. सावंत, गुरव, तांबे, गोसावी आोणि संस्थेचे चेअरमन सुभाष मडव आदी मान्यवर उपस्थित होते. व्हाट्सअपच्या माध्यमातुन सुर्यकांत चव्हाण, सतीश सावंत आणि मनिषा कदम यांनी अगोदरच चार पाच वर्षापूर्वी सर्व मित्र मैत्रिणींना ग्रुप वर जॉईन केलं होतं, पंचवीस वर्षांनी २०२० साली गेटटुगेदर करण्याचे ठरलं होतं परंतु कोरोणामुळे ते शक्य झाले नाही. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सुवर्णा सावंत आणि विजया काजरेकर यांनी पार पाडली. वयाची 75 /80 पार केलेल्या शिक्षकांचा उत्साह मुलांनाही अचंबित करणारा होता. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आपण शाळेमुळे कसे घडलो आणि त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला.

त्यानंतर शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, देसाई सरांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना सांगितलं की असेच भेटत राहा भेटल्याने ऊर्जा निर्माण होते आणि मैत्रीचा भाव वाढत जातो सध्या हायस्कूल चे मुख्याध्यापक सावंत सरांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना शाळा आणि विद्यार्थी यांचे नाते आई आणि मुलांसारखे असते ते सर्वांनी जपायला हवे असे म्हटले. संस्थेचे चेअरमन सुभाष मडव यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थी आपला स्नेह मेळावा कुठेतरी समुद्राच्या ठिकाणी रिसॅार्टवर करतात पण एस् एस् सी बॅच ने आपला पहिला स्नेहमेळावा शाळेत आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्वांनी जड अंतःकरणाने शिक्षकांना निरोप घेतला त्यावेळी विद्यार्थ्यांना दहावीचा निरोपसमारंभाची आठवण झाली, सर्वंजण भाऊक झाले होते, जड झालेली पावलं बाहेरचा रस्ता चालत होती पण हळवं झालेले मन फिरून फिरून मागे कार्यक्रमस्थळी पिंगा घालत होतं एक समृद्ध अनुभव घेऊन एका संस्मरणीय दिवसाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

You cannot copy content of this page