Headlines

राज्य नाट्य स्पर्धेत श्याम चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार पुरस्कार

⚡मालवण ता.१२-: कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मालवण-आडवण (देऊळवाडी) चे सुपुत्र श्याम चव्हाण यांनी आद्वतीय यश संपादन केले आहे. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकारचे प्रथम व द्वितीय असे दोन्ही पुरस्कार त्यांनी पटकावून स्पर्धेत अनोखा विक्रम केला आहे. श्याम चव्हाण यांना यापूर्वी मराठी राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत व प्राथमिक फेरीत २००…

Read More

जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्य पदी हरिश्चंद्र पवार यांची बिनविरोध निवड

सावंतवाडी तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत अध्यक्षांच्या हस्ते अभिनंदन ⚡सावंतवाडी ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी सावंतवाडी तालुका पत्रकार समितीतर्फे हरिश्चंद्र चंद्रकांत पवार यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.सावंतवाडी तालुका पत्रकार समितीची अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ही निवड करण्यात आली. रविवारी सावंतवाडी येथील नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षामध्ये सावंतवाडी तालुका पत्रकार समितीची बैठक…

Read More

त्यांनी दिले “त्या” गायीच्या पायांना नवे बळ

मालवणात सामाजिक संस्थांनी घडविले माणुसकीचे यथार्थ दर्शन !! ⚡मालवण ता.१२-: पायाचे खुर वाढल्याने चालणेही मुश्कील बनलेल्या एका गायीची वेदनादायी घटना निदर्शनास आल्यानंतर मालवणातील एकता मित्र मंडळासह १०० एडियट्स आणि मातृत्व आधार फाउंडेशनने याची दखल घेत युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांच्या पुढाकारातून गायीचे पायाचे वाढलेले खुर आज कापून त्या गायीला वेदनामुक्त करतानाच तिच्या पायांना नवे…

Read More

उडता न येणाऱ्या पक्ष्यावर उदय रोगे यांच्याकडून उपचार

⚡मालवण ता.१२-: सर्जेकोट येथील अजय वझे यांना त्यांच्या अंगणात आढळून आलेल्या खंड्या (किंगफिशर) या पक्ष्याला उडता येत नसल्याने त्यांनी याबाबतची माहिती पक्षीप्रेमी उदय रोगे यांना दिल्यावर रोगे यांनी या पक्ष्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. दोन दिवसांनी या पक्ष्यास उडणे शक्य झाल्यावर त्याला सोडून देण्यात येणार आहे, अशी माहिती उदय रोगे यांनी दिली….

Read More

एसबीसी राज्य संघर्ष समितीच्या उपाध्यक्षपदी सुरेश बापर्डेकर यांची नियुक्ती

⚡मालवण ता.१२-:विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती राज्य संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तारकर्ली गावचे सुपुत्र श्री.सुरेश बापर्डेकर यांची नुकतीच निवड झाली. सुरेश बापर्डेकर हे १९८५ सालापासून गाबीत समाजासाठी काम करत आहेत. सुरेश बापर्डेकर हे २००६ पासून विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती राज्य संघटनेत कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. या संघटनेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत…

Read More

सुवर्ण पदक प्राप्त सॅड्रा फर्नांडीस हिचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.१२-: फॉरेन्सिक सायन्स लॅब क्रीमीनॉलॉजी धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये उभादांडा गावची रहिवासी कु. सॅड्रा सिलेस्टीन फर्नांडिस ही सुवर्ण पदक घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तसेच कर्नाटक राज्यात यश मिळवणारी महाराष्ट्रातील ही पहिली विद्यार्थीनी असल्याने महाराष्ट्र राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच वेंगुर्ला तालुक्याचे नाव रोशन केल्याबद्दल उभादांडा – सागरेश्वरवाडी येथील घरी जाऊन भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने शाल, भेटवस्तू…

Read More

विनापरवाना मातीची खोदाई करुन चोरी करणा-यांवर कारवाई करा

⚡वेंगुर्ला ता.१२-: वायंगणी-कोंडुरा येथील आमच्या सामाईक माड बागायती मध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग व ठेकेदार क्षित्रय कंट्रक्शन कोल्हापूर यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून माड बागायतीच्या जमिनीचे नुकसान करत रस्त्याच्या व पुलाच्या नावाखाली विनापरवाना बेसुमार खोदाई करून मातीची चोरी केली असल्याने त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोंडुरा येथील प्रशांत…

Read More

ज्येष्ठांशी संवादाने आनंद मिळतो

अर्चना घारे परब:राष्ट्रवादीच्या २३ व्या वर्धापन दिनी ज्येष्ठ नागरिकांचा करण्यात आला सत्कार ⚡सावंतवाडी ता.१२-: कोकणच्या जडणघडणीत येथील ज्येष्ठ नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्याशिवाय आनंदही मिळतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळा…

Read More

पाडलोसमध्ये कालवा पुलावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करणार

ग्रा.पं.सदस्य लिना माधव ः पंधरादविसांत उखडलेल्या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ⚡बांदा ता.१२-: पाडलोस मधील कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे काम करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला नसतानाही रस्ता उखडला. त्यानंतर प्रशासनाकडे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. अशा धोकादायक कामाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी कोणतेही निवेदन न देता पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांत फलक लावून…

Read More

कणकवलीतील मिनी एमआयडीसी
आता कायमस्वरूपी ओळख पुसणार

⚡कणकवली ता.१२-: कणकवली सारख्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या शहराच्या ठिकाणी राज्य शासनाच्या मिनी एमआयडीसीच्या जागेची आता विक्री होणार आहे. त्‍यासाठी १४ जून पर्यंत निविदा मागविण्यात आल्‍या आहेत. एकूण ७४.७१ गुंठे क्षेत्र असलेल्‍या या जागेची २ कोटी ८४ लाख रूपये किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. कोकण विकास महामंडळाच्या ताब्‍यात असलेल्‍या या लघु औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा नव्याने उद्योग…

Read More
You cannot copy content of this page