⚡वेंगुर्ला ता.१२-: फॉरेन्सिक सायन्स लॅब क्रीमीनॉलॉजी धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये उभादांडा गावची रहिवासी कु. सॅड्रा सिलेस्टीन फर्नांडिस ही सुवर्ण पदक घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तसेच कर्नाटक राज्यात यश मिळवणारी महाराष्ट्रातील ही पहिली विद्यार्थीनी असल्याने महाराष्ट्र राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच वेंगुर्ला तालुक्याचे नाव रोशन केल्याबद्दल उभादांडा – सागरेश्वरवाडी येथील घरी जाऊन भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
फॉरेन्सिक सायन्स अँड क्रीमीनॉलॉजी हा विषय खुप आव्हानात्मक विषय म्हणून ओळखला जातो. यात गुन्हे विषयक सखोल अभ्यास असतो. अशा या आव्हानात्मक विषयात विशेष प्राविण्य मिळवीत सुवर्णपदक मिळवून उभादांडावासीयांची मान गर्वाने ताठ झाली आहे, असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस यांनी केले. यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे सायमन फर्नांडिस, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, परबवाडा उपसरपंच संतोष सावंत, सिलेस्टीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
