⚡मालवण ता.१२-:
विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती राज्य संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तारकर्ली गावचे सुपुत्र श्री.सुरेश बापर्डेकर यांची नुकतीच निवड झाली. सुरेश बापर्डेकर हे १९८५ सालापासून गाबीत समाजासाठी काम करत आहेत.
सुरेश बापर्डेकर हे २००६ पासून विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती राज्य संघटनेत कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. या संघटनेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत आमने आणि सरचिटणीस बालाजी चिनके कार्याध्यक्ष दत्ताभाऊ चेचर, मार्गदर्शक सखाराम मालाडकर, अरुण सरवदे यांनी सुरेश बापर्डेकर यांची उपाध्यक्षपदी निवड घोषित केली.
श्री. बापर्डेकर हे अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाचे सरचिटणीस असून सामाजिक कार्यकर्तेही आहेत. बापर्डेकर यांनी समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि मार्गदर्शक सखाराम मालाडकर, शंकर पोसम विजय राऊळ आणि अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत आज बऱ्याच आंदोलन, मोर्चा, उपोषणे आणि जाहीर सभा यामध्ये सक्रिय भाग घेतला आहे. दिल्ली पासून गल्ली पर्यंत समाजातील बराच अडचणीला शासन दरबारी न्याय मागणे आणि त्याचे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून समस्या निवारण करत आहेत. गाबीत समाजातील मुलांना जातीच्या दाखल्यासाठी येणाऱ्या समस्या, अडचणी सोडवून मुलांना दाखले मिळावेत यासाठीही बापर्डेकर प्रयत्न करत असतात.
