त्यांनी दिले “त्या” गायीच्या पायांना नवे बळ

मालवणात सामाजिक संस्थांनी घडविले माणुसकीचे यथार्थ दर्शन !!

⚡मालवण ता.१२-: पायाचे खुर वाढल्याने चालणेही मुश्कील बनलेल्या एका गायीची वेदनादायी घटना निदर्शनास आल्यानंतर मालवणातील एकता मित्र मंडळासह १०० एडियट्स आणि मातृत्व आधार फाउंडेशनने याची दखल घेत युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांच्या पुढाकारातून गायीचे पायाचे वाढलेले खुर आज कापून त्या गायीला वेदनामुक्त करतानाच तिच्या पायांना नवे बळ दिल्याने या सामाजिक संस्थांच्या कार्याची दखल समाज मनाने घेत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला

मालवण शहरात अनेक मोकाट गुरे फिरत असून यातील एका गायीच्या चारही पायाचे खुर वाढून ते पुढून वरच्या दिशेने वाकले होते. यामुळे गायीला नीट चालता येत नव्हते तसेच एक एक पाऊल टाकताना त्या गायीला वेदनांना सामोरे जावे लागत होते. या गायीबाबतची माहिती मालवण बाजारपेठेतील व्यापारी हेमचंद्र कोयंडे तसेच सदानंद मालंडकर यांनी फेसबुक वर पोस्ट केल्यानंतर ही माहिती सर्वत्र व्हायरल झाली. या गायीला चालताना होणारा त्रास लक्षात घेऊन गायीवर उपचार करण्यासाठी मालवण सोमवार पेठ येथील एकता मित्र मंडळासह १०० इडियट्स हा व्हॉट्सअप ग्रुप तसेच मातृत्व आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी चर्चा घडविली ही चर्चा सोशल मीडियावर सुरू असतानाच खुर कापणाऱ्या व्यक्तींचा शोधही घेतला जात होता. या कार्यात अमेय देसाई यांनी पुढाकार घेत सोमवार पेठ येथील आपल्या घरानजीकच्या मांगरात या गायीला सुरक्षितरित्या बांधून ठेवले. तसेच खुर कापणाऱ्या व्यक्तीचा शोधही घेत त्यांना पाचारण केले.

आज दिलावर पटेल आणि वैभव मेस्त्री यांच्या मदतीने गेळे कापण्याचे काम फत्ते करण्यात आले खुर कापल्यानंतर या गायीला सहजगत्या चालणे शक्य झाले आहे. यासाठी सुशांत पवार, अमेय देसाई, डॉ. कमलेश चव्हाण, सचिन गोवेकर, शैलेश नामनाईक, राजा शंकरदास , विध्या मेस्त्री, संतोष नागवेकर, जयमाला मयेकर, बाळु देसाई , सचिन मोर्वेकर, किशोर गरगटे, मयु पाटकर, मंदार ओरसकर , ललीत मेस्त्री , ग्रुप ऍडमिन सीझर डिसोझा व इतरांनी प्रयत्न केले प्राण्यांचेही एक जीवन असते याची जाणीव ठेवत माणुसकीचे दर्शन घडवीणाऱ्या या सर्वांचे कौतुक होत आहे

You cannot copy content of this page