⚡मालवण ता.१२-: कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मालवण-आडवण (देऊळवाडी) चे सुपुत्र श्याम चव्हाण यांनी आद्वतीय यश संपादन केले आहे. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकारचे प्रथम व द्वितीय असे दोन्ही पुरस्कार त्यांनी पटकावून स्पर्धेत अनोखा विक्रम केला आहे.
श्याम चव्हाण यांना यापूर्वी मराठी राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत व प्राथमिक फेरीत २०० हून अधिक पारितोषिके पटकावली आहे. तसेच कामगार कल्याण, हिंदी व गुजराती नाट्य स्पर्धेतही त्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरी विघ्नहर्ता प्रतिष्ठान मुंबईच्या `दी सेल ऑफ सर्ग्यावालं ‘ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. याच नाटकाची प्रकाशयोजना करणारे श्याम चव्हाण यांना प्रकाशयोजनेसाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
