⚡मालवण ता.१२-:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा हायस्कूल वायरी भूतनाथच्या इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी कु अन्विती सुनील चव्हाण हिने ८१ गुण आणि कु. सुकन्या विश्वजीत लोके हिने ८० गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले या विद्यार्थ्यांची सारथी परीक्षेसाठी निवड झाली आहे
त्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या परीश्रमाचा निश्चित असा ठसा उमटला आहे. शिक्षकांनी नेमून दिलेल्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजन, मार्गदर्शन वर्ग, सराव चाचण्या आणि विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास या योग्य ताळमेळ यामुळेच यश प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक प्रवीण कुबल यांनी मार्गदर्शन केले या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री संजय खोचरे यांनी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
