Headlines

हिमाचल प्रदेशात खासगी बस दरीत कोसळली,

शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू ⚡शिमल दि.०४-: हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. सकाळीच प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस दरीत कोसळली. यात शाळकरी मुलांचाही समावेश होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेत,शाळकरी मुलांसह जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून अजूनही काही अपघात ग्रस्तांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती…

Read More

बहुमत चाचणीआधी शिवसेनेला मोठा धक्का,

सेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील ⚡मुंबई दि.०४-: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला बहुमत चाचणीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान सुद्धा…

Read More

भात लावणीला जोरदार सुरुवात

पावसामुळे पोषक वातावरण ⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-: सर्वत्र पावसाने आता जोरदार सुरुवात केल्यामुळे भात लावणीच्या कामाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेग आला आहे तालुक्यात ठिकठिकाणी तरवा काढणी व भात लावणीच्या कामात शेतकरी व्यस्त झालेले चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसात काही ठिकाणी पेरणी करून ठेवलेले भात आता पूर्ण वाढले असल्याने तरवा काढणी…

Read More

बुद्धिबळ खेळामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढते

मळगाव येथील बुद्धिबळ प्रशिक्षणात कौस्तुभ पेडणेकर यांचे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-: बुद्धीबळ हा भारतीय खेळ आहे. या खेळाबरोबर मुलांनी अभ्यासालाही महत्त्व दिले पाहिजे. मुलांची आता विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता कमी झाली आहे. आणि ती क्षमता वाढविण्याचे काम बुद्धीबळ या खेळातून होते, त्यामुळे या खेळाला शालेय जीवनात फार महत्त्व आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी…

Read More

कोंबडींच्या पिंजऱ्यात घुसलेल्या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

सर्पमित्र देवेंद्र पाताडे यांनी तळगावला सहा फुटी अजगर पकडला ⚡ओरोस ता.०४-: तळगाव राणेवाडी येथील राजेंद्र भोगले यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या कोंबडींच्या पिंजऱ्यात घुसणाऱ्या जवळपास सहा फुटी अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम सुकळवाड पाताडेवाडी येथील सर्पमित्र देवेंद्र पाताडे यांनी केले. रविवारी रात्री कोंबडीच्या पिंजऱ्यातून कोंबड्यांचा आवाज येऊ लागल्याने भोगले यांनी बॅटरीच्या सहाय्याने पिंजऱ्यात बघताच त्यांना…

Read More

नेत्यांच्या मनात कामातून “विश्वास” निर्माण करणारा कार्यकर्ता

माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा आज जन्मदिन;भाजपचे युवा नेतृत्व म्हणून होत आहे ओळख ⚡सावंतवाडी ता.०४-: सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसेना शाखाप्रमुख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान शहराध्यक्ष, नगरसेवक ते आरोग्य व क्रीडा सभापती अशा प्रत्येक पदाला न्याय देणारे सुधीर आडिवरेकर यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे,  माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, आम नितेश राणे यांचा विश्वासू…

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🎈🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷🎈 🎂🎊🪷 सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती मा.श्री.सुधीर आडिवरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊🪷 ▪️🪷 श्री .संजू परब(भाजप जिल्हा प्रवक्ते;तथा माजी नगराध्यक्ष) ▪️🪷 श्री.अजय गोंदावळे(भाजप शहर मंडल अध्यक्ष;सावंतवाडी) ▪️🪷 श्री.परिमल नाईक(माजी आरोग्य सभापती) ▪️🪷श्री.उदय नाईक(माजी नगरसेवक) ▪️🪷श्री.विशाल परब(भाजप युवा नेते तथा उद्योजक) 🪷🎈तसेच तमाम सावंतवाडी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते 🪷🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच…

Read More

नवीन सरकार सहा महिन्यात कोसळू शकते

मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला लागा;शरद पवार यांचे आपल्या आमदारांना आदेश ⚡मुंबई दि.०३-: राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे.शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांचा सावंतवाडीत पार पडला सत्कार

आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीचे आयोजन;प्रकाश राठोड यांनी केले मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.०३-: बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्या वतीने आज रविवार दिनांक 3 जुलै रोजी 10 वी आणि 12 वी तसेच पदवी आणि स्कॉलरशिप परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी 10 वी,…

Read More

जीवनात मार्गदर्शन चांगले भेटले तर आयुष्याची वाटचाल सुखकर होते…

प्रा. आर एन काटकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीजिवनाच्या वाटचालीत चांगल्या मार्गदर्शनाबरोबरच चांगल्या मार्गदर्शकाचे फार मोठे स्थान असून जीवनात मार्गदर्शक चांगले भेटले तर आपल्या आयुष्याची वाटचाल सुखकर बनते. सुदैवाने मला माझ्या जीवनाच्या प्रवासात भेटलेल्या माणसांनी मला गुण दोषासह स्विकारत जे बहुमोल मार्गदर्शन केले ते आयुष्याच्या जडणघडणीत उपयुक्त ठरले असे प्रतिपादन मालवण येथील स. का. पाटील….

Read More
You cannot copy content of this page