नेत्यांच्या मनात कामातून “विश्वास” निर्माण करणारा कार्यकर्ता

माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा आज जन्मदिन;भाजपचे युवा नेतृत्व म्हणून होत आहे ओळख

⚡सावंतवाडी ता.०४-: सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसेना शाखाप्रमुख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान शहराध्यक्ष, नगरसेवक ते आरोग्य व क्रीडा सभापती अशा प्रत्येक पदाला न्याय देणारे सुधीर आडिवरेकर यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे,  माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, आम नितेश राणे यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्रा चॅनल ने घेतला हा धावता आढावा

सामान्य कुटुंबात जन्मलेला भाजपचा हा युवा चेहरा आता युवाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आपल्या कार्य कौशल्याच्या जोरावर जनतेच्या मनात त्यांनी आपल वेगळ स्थाननिर्माण केल. सावंतवाडी नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर जनतेन दिलेल्या संधीचं त्यांनी सोन केल. संजू परब यांच्या विजयात सुधीरभाईचा वाटा मोठा आहे. कोरोना काळात घरात बसून न राहता, शासनाच्या मदतीची वाट न पाहता हा नेता मैदानात होता. आपल्या वॉर्डमध्ये ८०० हून अधिक नागरिकांना मास्क, सॅनिटायझरच वाटप त्यांनी केल. एवढ्यावरच न थांबता जनसेवेसाठी कार्यरत असणा-या पोलीस कर्मचारी, कोरोना योद्धाना त्यांनी आपुलकीचा हात दिला.

त्यांच्या याच धडाकेबाज कार्यामुळे त्यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदावर बिनविरोध निवड झाली. आरोग्य सभापती म्हणून मागील सभापतीप्रमाणे त्यांनी साजेस काम केल. कोरोना वॉर्डसह शहर स्वछचतेवर लक्षकेंद्रित केल. नगरपालिकेला राज्यपातळीवरील मानाचे पुरस्कार प्राप्त करून दिले. दिलदार स्वभाव, रुबाबदार राहणीमान आणि सामाजिक कार्याची ओढ यामुळे युवकांच्या गळ्यातले ते ताईत बनले आहेत. यंग ब्रिगेडची ताकद त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्थाकडून त्यांना पुरस्कार देत सन्मानीत करण्यात आल आहे. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्यकडे पाहिलं जात. नगरसेवक म्हणून पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी केलेलं काम इतरांना मार्गदर्शक असच आहे.

म्हणूनच सुधीर आडीवरेकर यांना हक्काचा नगरसेवक म्हणून ओळखल जात. येत्या काळात सुध्दा सावंतवाडी नगरपालिकेतील सर्वोच्च पदावर सुधीरभाई असतील यात शंका नाही. अशा या हक्काच्या माणसाला ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! 

You cannot copy content of this page