कोंबडींच्या पिंजऱ्यात घुसलेल्या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

सर्पमित्र देवेंद्र पाताडे यांनी तळगावला सहा फुटी अजगर पकडला

⚡ओरोस ता.०४-: तळगाव राणेवाडी येथील राजेंद्र भोगले यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या कोंबडींच्या पिंजऱ्यात घुसणाऱ्या जवळपास सहा फुटी अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम सुकळवाड पाताडेवाडी येथील सर्पमित्र देवेंद्र पाताडे यांनी केले.

रविवारी रात्री कोंबडीच्या पिंजऱ्यातून कोंबड्यांचा आवाज येऊ लागल्याने भोगले यांनी बॅटरीच्या सहाय्याने पिंजऱ्यात बघताच त्यांना भला मोठा अजगर दिसून आला.त्यांनी शेजाऱ्यांना याची कल्पना दिली.यादरम्यान अजगराने एक कोंबडी गतप्राण केली होती.त्यानंतर तातडीने सुकळवाड पाताडेवाडी येथील सर्पमित्र देवेंद्र पाताडे यांना पाचारण करण्यात आले.देवेंद्र पाताडे यांनी सहाय्यक नितीन पाताडे यांच्यासह तेथे दाखल होत अजगराला शिताफीने पकडून जंगलमय भागातील नैसर्गिक अधिवासात सोडले.

You cannot copy content of this page